सोयाबीन

सोयाबीनवरील जिवाणूजन्य करपा

Pseudomonas savastanoi pv. glycinea

जीवाणू

थोडक्यात

  • पानांवर बारीक पिवळे ते तपकिरी ठिपके येतात जे नंतर गडद तपकिरी, अनियमित किंवा कोणेदार, विविध आकाराच्या डागात बदलतात.
  • पिवळसर हिरवी प्रभावळही या डागांभोवती तयार होते.
  • हे डाग शेंगांवरही असतात पण दाण्यांवर लक्षणे दिसत नाहीत.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

हंगामाच्या सुरुवातीला झालेले संक्रमण सुरुवातीच्या दोन पानांच्या कडांवर तपकिरी ठिपके येण्याने लक्षात येते. रोपांची वाढ खुंटते आणि जर शेंडा प्रभावित झाला तर मर देखील होऊ शकते. हंगामात नंतर लागण झाल्यास पानांवर बारीक पिवळे ते तपकिरी ठिपके येतात. कोवळी पाने जुन्या पानांपेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि लक्षणे प्रामुख्याने झाडीचा मध्य ते शेंड्यावर दिसतात. कालांतराने हे डाग एकमेकात मिसळून, गडद तपकिरी, अनियमित किंवा कोणेदार, विविध आकाराच्या डागात बदलतात. या डागाच्या भवताली असलेल्या पाणी शोषल्यासारख्या भागाच्या कडांत पिवळसर हिरवी प्रभावळ येते. या डागांचे केंद्र हळुहळु वाळून गळते ज्यामुळे झाडी फाटल्यासारखी दिसते. जर शेंगधारणेच्या काळात लागण झाली तर डाग शेंगांवर देखील येऊ शकतात ज्यामुळे त्या आक्रसतात आणि रंगहीन होतात. तथापि दाण्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सोयाबीनवरील जिवाणूजन्य करप्याचे नियंत्रण करण्यासाठी कॉपर बुरशीनाशकांचा वापर करण्याची शिफारस केली जाते. याचा चांगला परिणाम मिळण्यासाठी रोगाच्या सुरवातीलाच जेव्हा लक्षणे दिसण्यास सुरुवात होते तेव्हाच वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सोयाबीनवरील जिवाणूजन्य करप्याचे नियंत्रण करण्यासाठी कॉपर बुरशीनाशकांचा वापर केला जाऊ शकतो पण त्याचा परिणाम मिळण्यासाठी वापर हा रोगाच्या सुरवातीला केला जायला हवा. तथापि, या जिवाणूविरुद्ध बुरशीनाशके जास्त प्रभावी नसल्याने मुख्य एकीकृत कीटक व्यवस्थापन पद्धतींचा वापर करण्याची शिफारस केली जाते.

कशामुळे झाले

स्युडोमोनाज सावास्टानोइ नावाच्या जंतुमुळे जिवाणूजन्य करपा होतो. हा बियाणेजन्य रोग आहे जो शेतातील झाडांच्या अवशेषात जगतो. रोपावस्थेत संक्रमण होणे हे संक्रमित बियाणांचे चिन्ह आहे. जुन्या झाडात सुरवातीचे संक्रमण बहुधा सुप्त जिवाणूंचे वहन वारा किंवा उडणार्‍या पाण्याच्या थेंबांनी होते जे झाडांच्या अवशेषावरुन खालच्या पानांवर पसरते. पानांचा ओला पृष्ठभाग जिवाणूंच्या वाढीला पोषक असतो, जो काही काळातच पानांवरील नैसर्गिक छिद्रातुन किंवा जखमातुन आत शिरतो. एका झाडातून दुसऱ्या झाडात किंवा एकाच झाडाच्या विविध भागात वारा आणि पावसानेही दुय्यम संक्रमण होते. रोगाला थंड (२०-२५ अंश), ओले आणि वारा असणारे हवामान (वादळ) अनुकूल असते आणि उष्ण तसेच कोरडे हवामान प्रतिकूल ठरते.


प्रतिबंधक उपाय

  • या रोगास प्रतिकारक वाण निवडा.
  • रोगाचा प्रसार टाळण्यासाठी झाडे ओली असताना शेतात काम करु नका.
  • पुढील वर्षात रोगाचे संक्रमण शिल्लक राहु नये म्हणुन काढणीनंतर झाडांचे अवशेष नांगरुन मातीत मिसळा.
  • मका, गहू आणि इतर शेंगवर्गीय नसणार्‍या असंवेदनशील पिकांसह पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा