Pectobacterium carotovorum subsp. carotovorum
जीवाणू
सुरुवातीच्या लक्षणांमधे बर्याचदा पानांच्या शिरा गडद होणे आणि पनांवर करपट भाग तयार होणे निदर्शनात येते. खोड, फळ आणि फळांच्या देठांवर पाणी शोषल्यासारखे डाग येतात आणि झपाट्याने वाढतात. जसजसा रोग वाढत जातो, कोरडे, गडद तपकिरी किंवा काळे देवी सारखे व्रण फांद्यांवर विकसित होऊ शकतात, ज्यामुळे फांद्या बहुधा तुटतात. अखेरीस, संपूर्ण फळ एक ओला, मऊ आणि चिकट पदार्थाचा गोळा बनतो व झाडावर पाण्याची पिशवी लोंबकळत असल्यासारखे दिसते. एकुण बाधीत भागात जंतुचा स्त्राव दिसतो आणि घाणेरडा वासही असु शकतो. संक्रमित झाडे कालांतराने वाळून मर होते.
पेक्टोबॅक्टेरियम कारोटोव्होरम उपजात कारोटोव्होरमवर कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बियाणे आणि फळांवर सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाचे उपचार केल्यास पुढील संक्रमणास प्रतिबंध होतो. उदा. १% सोडियम हायपोक्लोराइटच्या (ब्लीच) द्रावणात ३० सेकंद बियाणे बुडवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
जिवाणुजन्य फळकुजीला जमिनीतून उद्भवलेले जीवाणू कारणीभूत असतात जे वातावरणात सर्वव्यापी असतात. त्यांचा संबंध जमिनीवरील पाणी आणि मातीशी जोडला जातो. उबदार आणि आर्द्र हवामान संक्रमणास अनुकूल असते. हे जिवाणू रोप हाताळणी, किड्यांचा प्रादुर्भाव आणि अतिसुर्यप्रकाशाने झालेल्या जखमातुन आत प्रवेश करतात. पेक्टोबॅक्टेरियम कारोटोव्होरम उपजात कारोटोव्होरमचे भरपूर यजमान आहेत उदा. बटाटे, रताळे, कॅसाव्हा, कांदे, कोबी, गाजर, टोमॅटो, बीन, मका, कापुस, कॉफी आणि केळी.