Pseudomonas savastanoi pv. savastanoi
जीवाणू
रोगाचे मुख्य दृष्य लक्षण आहे काटक्यांवर, फांद्यांवर, खोडांवर आणि मुळांवर वसंत ऋतुत आणि उन्हाळ्यात उठणार्या गाठी. फांद्यांवरही त्या बहुधा दिसतात पण नेहमीच पानांच्या पेरांवर किंवा फळांच्या फांदीवर दिसत नाहीत. खोडावरील ही विद्रुपता काही सेंटीमीटर व्यासापर्यंत पोचु शकते आणि क्वचित पानांवर किंवा कळ्यांवरही उठतात. फांदीची मर सामान्य आहे कारण गाठी पोषकांचे आणि पाण्याचे वहन इतर भागांपासुन तोडतात. सामान्यपणे संक्रमित रोपात जोम कमी असतो आणि वाढ खुंटलेली असते. जशा गाठी वाढतात, त्या पीडित काटकीला वेढुन मारतात, ज्यामुळे फळांचे आकार लहान होतात आणि प्रतही कमी भरते किंवा नविनच लागवड केलेल्या बागेत झाड मरते.
प्रतिवर्षी सेंद्रिय आणि कॉपरवर आधारीत जंतुनाशक उत्पादांचे दोन प्रतिबंधक वापर (शरद आणि वसंत ऋतुत) केल्यास झाडांवरील गाठी येण्याच्या घटना खूपच कमी होतात. छाटणीच्या जखमांवरही दूषिततेची शक्यता कमी करण्यासाठी कॉपर असणारे जंतुनाशकांचे (उदा. बोरडॉक्स मिश्रण) उपचार केले जाऊ शकतात. कॉपर सल्फेट असणारे काही उत्पादही प्रमाणित सेंद्रिय शेतीत वापरायची परवानगी आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या जंतुचे नियंत्रण करणे फारच कठिण असते. प्रतिवर्षी कॉपरवर आधारीत (मँकोझेब बरोबर) जंतुनाशक उत्पादांचे दोन प्रतिबंधक वापर (शरद आणि वसंत ऋतुत) केल्यास बागेतुन रोगाच्या घटना कमी होतात. छाटणीच्या जखमांवरही दूषितता टाळण्यासाठी कॉपर असणारे जंतुनाशकांचे उपचार केले जाऊ शकतात. उपकरणे वापरुन काढणी केलेल्या झाडांवरही काढणीनंतर लगेच उपचार करायला हवेत.
स्युडोमोनाज सवास्टानोइ जातीच्या जंतुंमुळे लक्षणे उद्भवतात. हे जंतु ऑलिव्हच्या पानापेक्षा खोडाच्या सालीवर चांगले फोफावतात. संक्रमणाच्या गंभीरतेचे प्रकार विविध असतात पण ऑलिव्हची कोवळी रोपे जुन्या रोपांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. जंतु गाठीत जगतात आणि पावसात ह्यातुन गळणार्या संक्रमित जंतुंच्या स्त्रावाबरोबर बाहेर पडतात. पावसाच्या उडणार्या पाण्याने किंवा अवजारांद्वारे ह्यांचे वहन पूर्ण वर्षभर निरोगी रोपांवर होत रहाते. पानांवरील व्रण, सालीवरील फटी, छाटणी किंवा काढणीच्या जखमा ह्यांच्या प्रसारास प्रोत्साहन देतात. हिवाळ्यात गोठण्याने झालेले नुकसान खासकरुन समस्या निर्माण करते कारण त्याच वेळी पावसाळी दिवसही असतात, ज्यामुळे साथ येण्यासाठी उत्तम परिस्थिती असते. संक्रमण झाल्यानंतर १० दिवस ते काही महिन्यात गाठी एकेकट्या किंवा शृंखलेने येतात.