लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील मंद र्‍हास (ग्रीनिंग रोग)

Liberibacter asiaticus

जीवाणू

थोडक्यात

  • पानांवर विखुरलेले धब्बे दिसतात.
  • शीरा पिवळ्या पडतात.
  • झाडाची वाढ खुंटते.
  • अकाली पानगळ होते.
  • फळे हिरवी आणि बारीकच रहातात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

झाडाच्या पिवळ्या कोंबातुन पहिले लक्षण दिसते, म्हणुन रोगाचे हे सर्वसामान्य नाव, हाँगलाँगबिंग (ज्याचा शाब्दिक अर्थ आहे पिवळा ड्रेगॉन रोग). पाने कालांतराने फिकट पिवळी पडतात आणि पानांवर हलके गोळा झालेले ठिपके दिसतात जे झिंक किंवा मँगनीजच्या कमतरतेच्या लक्षणांसारखे दिसतात. या कमतरतेपासुन ही लक्षणे वेगळी आहेत हे समजण्याचा सर्वसामान्य मार्ग म्हणजे कमतरतेची लक्षणे शीरांना समांतर असतात तर रोगाची लक्षणे शीरांना समांतर नसतात. जास्त संक्रमित झाडांची वाढ खुंटते, अकाली पानगळ होते आणि फांद्या वाळतात. झाडाला भरपूर बेमोसमी फुले येतात जी नंतर गळतात आणि बारीक अनियमित जाड फिकट सालीची फळे धरतात जी बुडाजवळ हिरवीच रहातात (म्हणुन हे नाव लिंबुवर्गीय पिकांवरील मंद र्‍हास होय).

शिफारशी

जैविक नियंत्रण

या रोगावरील कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटकनाशकांचा उचित उपयोग केल्यास सिलिड वाहकांवर चांगले नियंत्रण मिळविता येते आणि त्यामुळे रोगाचा प्रसार सिमीत होतो. टेट्रासायकलीन प्रतिजैवकाचे इंजेक्शन झाडाच्या खोडात दिल्याने झाड थोडे सावरु शकते पण परिणाम मिळण्यासाठी हे वारंवार करावे लागते. टेट्रासायकलीन हे फायटोटॉक्झिक आहे आणि त्यामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. याच कारणांसाठी अलिकडील काही वर्षात याचा वापर कमी झाला आहे.

कशामुळे झाले

हाँगलाँगबिंग (एचएलबी)ची लक्षणे कँडिडाटस लायबेरिबॅक्टर एशियाटिकस नावाच्या जिवाणूमुळे उद्भवतात. या रोगाचा प्रसार डायाफोरिन सिट्रि आणि ट्रायाझो एरिट्रे नावाचे दोन सिलिड वाहक कायम करतात जे लिंबुवर्गीय झाडांवर कायमच असतात. एचएलबीचे वहन पिल्ले तसेच प्रौढ दोघेही त्यांच्या ३-४ महिन्याच्या जीवनकाळात राखुही शकतात आणि प्रसारही करतात. हाँगलाँगबिंग पद्धतशीर आहे आणि याचे संक्रमण झाल्यानंतर लक्षणे दिसेपर्यंत ३ महिने ते काही वर्षे देखील जाऊ शकतात. जरी त्याचा प्रसार दर बदलता असला तरी कलमाद्वारे देखील याचे संक्रमण होऊ शकते. बियांणांद्वारे देखील संक्रमण होऊ शकते. इतर रोग किंवा विकारातही असे ठिपके पानांवर दिसु शकतात म्हणुन झाडाच्या भागाचे नमुने विश्र्लेषणाकरीता प्रयोगशाळेत पाठवुन कारणांची खात्री करण्याची शिफारस करण्यात येते.


प्रतिबंधक उपाय

  • देशातील क्वारंटाईन नियमांबाबत जागरुक रहा.
  • लिंबुवर्गीय बागांचे नियमितपणे या रोगाच्या लक्षणांसाठी निरीक्षण करा.
  • प्रभावित झाडे लगेच काढुन टाका.
  • कामगारात आणि वापरल्या जाणार्‍या उपकरणांच्या स्वच्छतेचे परिमाण उच्च राखा.
  • मुराया पॅनिक्युलाटा, सेव्हेरिनिया ब्युक्सिफोलिया आणि इतर लिंबुवर्गीय (रुटासी कुटुंबातील) झाडे सिलिडसचे पर्यायी यजमान काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा