लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील स्टबर्न रोग

Spiroplasma citri

जीवाणू

थोडक्यात

  • वाढ खुंटते, झाडी सरळ ताठ उभी वाढते, पाने पिसांसारखी असतात आणि पेऱ्यातील अंतर कमी होऊन झाड झुडुपासारखी वाढतात.
  • अनियमित फुलधारणेमुळे फळांचा असामान्य विकास होऊन आकार आणि परिपक्वता प्रभावित होते.
  • पानांवर ठिपके येतात जे (जस्त) पोषकांच्या कमतरतेच्या लक्षणांसारखे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

रोगाची तीव्रता, पर्यावरण, झाडाचे वय आणि वर्षाची वेळ यावर अवलंबुन लक्षणे बदलु शकतात. उष्ण उन्हाळ्याच्या महिन्यात लक्षणे बहुधा जास्त दृष्य असतात पण संक्रमित झाडे तशीच वर्षानुवर्षे लक्षणे न दर्शिवता राहू शकतात. वैशिष्ट्यपूर्ण लक्षणात येतात : खुंटलेली वाढ, झाडी सरळ ताठ उभी वाढते, पाने पिसांसारखी असतात आणि पेऱ्यातील अंतर कमी होऊन झाड झुडुपासारखी वाढतात. कोवळी झाडे लहान आणि वांझ रहातात तर मोठी झाडे एखाद्याच फांदीवर लक्षणे दर्शवितात. अनियमित फुलधारणेमुळे फळांचे असामान्य विकास होऊन आकार आणि परिपक्वता प्रभावित होते. पानांवर ठिपके येतात जे (जस्त) पोषकांच्या कमतरतेच्या लक्षणांसारखे दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

आजपर्यंत तरी एस. सिट्री या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैविक उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे या रोगावरील काही उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या रोगावर कोणतेही रसायनिक नियंत्रण पर्याय उपलब्ध नाहीत. वाहकांविरुद्धचे कीटकनाशक उपचार प्रभावी नाहीत कारण एस. सिट्रीचा प्रसार बागेत आल्यानंतर झपाट्याने होतो.

कशामुळे झाले

स्पिरोप्लाझ्मा सिट्री नावाच्या जिवाणूमुळे ही लक्षणे उद्भवतात, जे झाडाच्या वाहक भागात रहातात आणि साखरेच्या वहनात बाधा आणतात. तुडतुड्यांच्या अनेक प्रजाती या जिवाणूचे प्रसार अविरतपणे करतात. जिवाणू वाहकातच संख्येने वाढतात पण वाहकाच्या पुढच्या पिढीत ते संक्रमित होत नाहीत. जिवाणूचे मुख्यत: प्राथमिक प्रसार तुडतुड्यांद्वारे लिंबुवर्गीय पिकांवर होते. दुय्यम प्रसार (एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर) संक्रमित झाडाच्या सामग्री द्वारे कलम करण्याने किंवा डोळा भरल्याने होते. या रोगास गरमट आणि दाट वाढीचे क्षेत्र मानवते, जिथे ते प्रामुख्याने गोड नारंगी, द्राक्ष आणि टेंगेलो झाडांना प्रभावित करते. लक्षणांची गंभीरता विविध लिंबुवर्गीय पिकात वेगवेगळी असते. प्रौढ बागांपेक्षा कोवळ्या बागेत हा रोग जास्त समस्या निर्माण करतो. बहुधा याचे निदान करणे देखील कठिण असते, खासकरुन रोगाच्या सुरवातीच्या विकासाच्या टप्प्यावर जेव्हा लक्षणे फारच सूक्ष्म किंवा जेव्हा इतर विकार उपस्थित असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोतांकडुन रोप किंवा कलमाची सामग्री घ्या.
  • रोगाच्या लक्षणांसाठी काळजीपूर्वक निरीक्षण करा.
  • रोगी आणि वांझ झाडे बदला.
  • तुडतुड्यांना आकर्षित करणारे व यजमान नसणार्‍या झाडांची लागवड बागेच्या शेजारी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा