Ralstonia solanacearum
जीवाणू
संक्रमित झाडांची कोवळी पाने कोमजतात आणि नंतर मर होऊन कोलमडतात. देठांतील जोम जातो, ज्यामुले हिरवी पाने देखील लोमकाळतात आणि झाडाचा जोम कमी होतो. जसजसा रोग वाढतो, जुन्या पानांवरही प्रभाव दिसु लागतो. स्पष्ट, फिकट पिवळी ते तपकिरी रंगहीनता शिरा कापल्यास दिसते. संक्रमित फळांचे आकार विकृत होतात आणि आतील गर कोरड्या कुजीमुळे नष्ट झाल्याने आक्रसतात, आत फक्त गडद तपकिरी रंगाचा रंगहीन मांसल भाग दिसतो. जर फळे उघडली तर जिवाणूचा स्त्राव दिसु शकतो. झाडात जिवाणू वाढल्याने वहनाची समस्या होते आणि पाणी तसेच पोषके झाडाच्या वरच्या भागात पोचत नाहीत.
रोपाभोवती ब्लीचिंग पावडर पसरल्यास रोगाचा प्रसार सिमीत करता येतो. लागवडीआधी जमिनीत १% बोर्डो मिश्रणाची आळवणी करा, ०.४% कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा स्ट्रेप्टोमायसिन किंवा स्ट्रेप्टोमायसिलिन (५ ग्राम/ १०ली.) सारख्या प्रतिजैविकांत ३० मिनीटे रोप बुडवून नंतर लागवड करावी.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मोको रोगासाठी कोणतेही थेट रसायनिक उपचार उपलब्ध नाही.
रालस्टोनिया सोलानासेरम नावाच्या जिवाणूमुळे मोको नावाचा केळीवरील रोग होतो. हे संक्रमित झाडांच्या भागात किंवा इतर यजमानांवर पूर्ण वर्ष रहातात किंवा जमिनीत १८ महिन्यापेक्षा अधिक काळ राहू शकतात. उच्च तापमान आणि जमिनीतील उच्च आर्द्रता रोगास चांगली मानवते. जंतुंचा प्रसार एका झाडा वरून दुसऱ्या झाडावर किंवा बागांतुन वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. झाडाचे सर्व भाग (मुळापासुन ते फळांच्या सालीपर्यंत) संक्रमाणाचे संभाव्य स्त्रोत आहेत. याच कारणासाठी, छाटणी तसेच झाडास इजा होणे टाळावे. संक्रमित माती जेव्हा गाडीच्या चाकाला लागुन, पायताणाने किंवा प्राण्यांद्वारे पसरते तेव्हा प्रसाराचा तो आणखीन एक स्त्रोत असतो. फुल खाणारे किडे किंवा पक्षी (मधमाशी, वॅस्पस आणि फळमाशी) आणि पर्यायी यजमान देखील रोगाचा प्रसार करु शकतात. रोगाचा प्रसार सिंचनाद्वारे किंवा वाहत्या पाण्यानेही होऊ शकतो.