Xanthomonas oryzae pv. oryzae
जीवाणू
कोवळ्या रोपांची संक्रमित पाने प्रथम पिवळी ते गव्हाळ होऊन नंतर मरगळुन वाळतात. पक्व रोपांत प्रादुर्भावाचा काळ हा मुख्यत: फुटव्यांपासुन ते ओंबी तयार होईपर्यंतचा असतो. पक्व रोपांवर सुरुवातीला पानांवर फिकट हिरवे ते राखाडीसर हिरवे, पाणी शोषल्यासारखे पट्टे निर्माण होतात. कालांतराने हे पट्टे एकमेकात मिसळतात आणि मोठ्या पिवळसर ओबड धोबड कडा असलेल्या डागात रुपांतरीत होतात. पाने पिवळी पडून वाळतात. संक्रमणाच्या शेवटच्या टप्प्यावर, पानांतुन जीवाणूंचा दुधाळ स्त्राव झिरपताना दिसतो. हा स्त्राव नंतर सुकुन पांढर्या खपल्या तयार होतात. या गुणधर्मामुळे काही खोड किड्यांच्या नुकसानापासुन या रोगाला वेगळे काढता येते. जिवाणूजन्य करपा हा भातावरील फार विनाशकारी रोगातील एक आहे.
आजतागायत भातावरील कडा करप्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही जैविक उत्पाद बाजारात उपलब्ध नाहीत. कॉपरवर आधारीत उत्पादांच्या वापराने लक्षणे कमी होऊ शकतात पण रोगाचे नियंत्रण केले जात नाही.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कडा करप्याचा मुकाबला करण्यासाठी अधिकृत प्रतिजैवके + कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर सल्फेटच्या बीजप्रक्रियेची शिफारस करण्यात येते. प्रतिजैवकांचा वापर काही देशात वर्जित आहे म्हणुन आपल्या देशात वापरण्यात येणारे उपाय तपासा.
झँथोमोनाज ओरिझे पीव्ही. ओरिझे नावाच्या जीवाणूमुळे लक्षणे उद्भवतात जो गवती तण, संक्रमित रोपांच्या अवशेषात जगतो. या जंतुंचे वहन वारा, पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी उडण्याने होते. म्हणुन वाईट हवामान (वारंवार पाऊस, वारा) उच्च आर्द्रता (७०% वर), आणि उबदार तापमान (२५ ते ३० अंश) असल्यास या रोगाच्या घटना आणि गंभीरता वाढते. उच्च नत्र पातळी असलेली खते किंवा खूप दाट लागवड खासकरुन संवेदनशील वाणात देखील या रोगास अनुकूल आहेत. जितक्या लवकर रोग संक्रमण होते तितका जास्त उत्पादनाचा नाश होतो. ओंबी विकसित होण्याच्या काळात संक्रमण झाल्यास उत्पादनात घट होत नाही पण फुटलेल्या धान्याचे प्रमाण वाढते. उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण वातावरणात, विशेषत: सिंचीत आणि कोरडवाहू खोलगट भागात हा रोग होतो.