Xanthomonas citri pv. mangiferaeindicae
जीवाणू
आंब्यावरील जिवाणूजन्य काळ्या डागांची मुख्य लक्षणे पानांवर आणि फळांवर दिसतात पण जास्त प्रादुर्भाव झाल्यास ती काटक्या आणि फांद्यांवरही दिसु शकतात. सुरवातीला पानांवर बारीक काळे आणि पाणी शोषल्यासारखे ठिपके दिसतात. ह्या ठिपक्यांची कडा पिवळसर असते आणि हे ठिपके शिरांनी मर्यादित असतात. जसा रोग वाढतो तसे हे ठिपके सुकतातआणि पानगळही होते. सुरवातीला संक्रमित फळांवर पाणी शोषल्यासारखे फिकट ठिपके येतात. कालांतराने काळ्या तार्यांच्या आकाराचे खोलगट होऊन त्यातुन संक्रमित चिकट स्त्राव झिरपतो ज्यामुळे संधीसाधु जंतु आकर्षिले जातात. कमी प्रदुर्भावात फळांची प्रत खालवते तर जास्त प्रादुर्भाव झाल्यास फळे गळतात. फांद्या आणि देठांवरील ठिपके काळे दिसतात आणि परिणामी चिरा पडतात ज्यामुळे झाडाची स्थिरता कमजोर होते.
कॉपर ऑक्झिक्लोराइड असलेल्या उत्पादांची नियमित फवारणी केली असता संसर्गाचा प्रतिबंध आणि नियंत्रण करता येतो. जैव नियंत्रण एजंटस जसे कि अॅसिनेटोबॅक्टर बौमानीचा वापर संक्रमित झाडांवर केला असताही झॅ. सिट्रिची लोकसंख्या कमी करण्यात प्रभावी ठरते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थायोफेनेटमिथाइल किंवा बेन्झिमिडाझोल सारख्या औषधांची फवारणी केल्यास जिवाणूजन्य काळ्या डागांचे नियंत्रण केले जाऊ शकते.
झॅन्थोमोनाज सिट्री नावाच्या जीवाणूमुळे हा रोग होतो. हे झाडांच्या जिवंत भागांमध्ये ८ महिन्यांपर्यंत जिवंत राहु शकतात. हे झाडाच्या नैसर्गिक छिद्रातुन आणि जखमेतुन आत प्रवेश करतात. जीवाणू एका झाडावरुन दुसर्या झाडावर पावसासकट वाहणार्या जोरदार वार्याबरोबर किंवा शेतकामात, जसे छाटणीत, वापरल्या जाणार्या अवजारांद्वारे पसरतात. किंवा संक्रमित कलमे हलविताना किंवा फळांच्या बाबतीत थेट संपर्कानेही पसरतात. जिवाणूजन्य काळ्या डागांची लागण होण्यासाठी अनुकूल तापमान २५ ते ३० डिग्री सेल्शियस असते. उच्च आर्द्रतेनेही संसर्गास चालना मिळते. बागेला जोरदार वार्यापासुन वाचविण्यासाठी संरक्षक कुंपण किंवा दाट झाडी असणारी झाडे बांधावर लावल्यासही रोग पसरणे कमी होऊ शकते.