टोमॅटो

टोमॅटो पिकावरील जिवाणूजन्य देवी रोग

Clavibacter michiganensis subs. michiganensis

जीवाणू

थोडक्यात

  • कडांपासुन सुरु होऊन पाने पिवळी पडणे, गोळा होणे आणि मरगळणे.
  • फळांवर प्रभावळीसह तपकिरी डाग येतात.
  • कुजलेल्या खोडांवर उभे पट्टे दिसतात.
  • खोड चिरतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

टोमॅटो

लक्षणे

संक्रमित रोपे अशक्त, खुजी असतात आणि पानांच्या शिरांवर तसेच देठांवर बारीक पांढरे ठिपके दितात. प्रौढ झाडांमधील लक्षणे, प्राथमिक संक्रमण कोवळ्या भागात (आंतरभागातुन) पसरल्यामुळे किंवा दुय्यम संसर्गामुळे होऊ शकतात. जुन्या पानांच्या (काही वेळेस फक्त एकाच बाजूला) दोन शिरांमधील भाग पिवळा पडणे आणि पाने गोळा होऊन करपणे हे संक्रमण आंतरभागातुन पसरण्याचे वैशिष्ट्य आहे. अखेरीस पाने तपकिरी होऊन गळतात. देठ बहुधा हिरवेच रहातात आणि फांदीवरच रहातात. नविन संक्रमणाची वैशिष्ट्ये म्हणजे पानांच्या कडेला गडद तपकिरी व्रण आणि पानांच्या पात्यावर प्रभावळीसह ठळक ठिपके येतात. खोडाच्या बुडाचा भाग कुजतो आणि गडद तपकिरी आणि तपकिरी उभे पट्टे वरच्या भागात दिसतात. लांब तपकिरी देवीचे व्रण येऊन खोड चिरतात. फळांवर ठळक प्रभावळ असलेले तपकिरी ठिपके येतात. जसजसा रोग वाढतो तसतसे संपूर्ण झाड सुकते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बियाणे ८% अॅसेटिक आम्ल किंवा ५% हायड्रोक्लोरिक आम्लात भिजवा. मिथाइल ब्रोमाइड किंवा पाण्याचे उपचारही आपण करु शकता.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. वारंवार पाऊस आणि फार काळ ओलावा रहाणे अशा परिस्थितीत जंतुनाशकांची फवारणी करा. ह्यामुळे पानांवरील करपा आणि फळांवरील ठिपके कमी होऊ शकतील. जर प्रतिबंधक उपाय केले असतील तर कॉपरवर आधारीत उत्पादांचा वेगळा फायदा होत नाही कारण क्षेत्रिय संक्रमणामुळे आर्थिक धोका फारच कमी असतो.

कशामुळे झाले

हे जिवाणू बियाणात, झाडांच्या अवशेषात किंवा जमिनीतही जिवंत राहू शकतात. त्यांचे संक्रमण संक्रमित बियाणामुळे, जमिनीतील जंतुमुळे किंवा छाटणीच्या वेळी होते. हे जिवाणू पानांच्या शिरांमध्ये संख्येने वाढतात आणि पाणी तसेच पोषकांच्या वहनात अडथळा निर्माण करतात. परिणामी झाडे सुकतात आणि मरगळतात. जमिनीतील उच्च आर्द्रता किंवा सापेक्ष आर्द्रता आणि उबदार तापमान (२४ ते ३२ डिग्री सेल्शियस) ह्या रोगाच्या वाढीस अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित रोगमुक्त बियाणे किंवा रोप वापरा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • रोप तयार करण्यासाठी शेतातील सुविधांऐवजी प्लास्टिकच्या ट्रेमध्ये मातीरहित माध्यमे वापरली जाऊ शकतात.
  • शक्य असल्यास जीवाणूंना मारण्यासाठी रोपवाटिकेची जागा व माती वाफेने निर्जंतुक करा.
  • शेतीउपायोगी अवजारे स्वच्छ ठेवा.
  • सोलॅनेसी जातीचे तण काढुन टाका.
  • शेताचे नियमित निरीक्षण करत चला आणि संक्रमित झाडे जमिनीच्या स्तरावरुन कापुन टाका.
  • सोलॅनेसी जात नसणार्‍या पीकांबरोबर टोमॅटोचे पीक फेरपालट किमान दोन ते तीन वर्षांसाठी करा.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरणी करून झाडांचे अवशेष गाडुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा