Streptomyces scabies
जीवाणू
झाडाच्या वरच्या भागात म्हणजे पान, फांद्या किंवा देठांवर लक्षणे दिसत नाहीत. बहुधा रोगाची पहिली लक्षणे कोवळ्या कंदाच्या पृष्ठभागावर दिसतात आणि जसे कंद पक्व होतात तशी खालील लक्षणे दिसु लागतात: लालसर तपकिरी रंगाचे वरवर असणारे भाग सालीवे दिसतात, लालर तपकिरी रंगाचे खडबडीत उंचवटे सालीवर दिसतात, गडद रंग, उथळ किंवा खोल छिद्रे आणि जाळीसारख्या चिरा. एकापेक्षा जास्त प्रकारची लक्षणे एकाच कंदावर दिसु शकतात. इतर कंद आणि मुळवर्गाची पिके प्रभावित होऊ शकतात, जसे कि बीट, गाजर, पार्सनिप आणि मुळा. सगळ्याच बाबतीत ह्याचा परिणाम कंदांची प्रत कमी होण्यात आणि उत्पन्नाच्या नुकसानात होतो.
कंपोस्ट, कंपोस्ट चहा किंवा यांच्या संयोगाचे उपचार केल्याने या सामान्य स्कॅब ट्युबर रोगाची तीव्रता कमी होते. जीवाणूंच्या स्पर्धात्मक प्रजातींवर आधारित जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादनही वाढते व कंदाची प्रतही सुधारते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बटाट्यावरील बांगडी रोगाचा रसायनिक उपचार कठिण असतो कारण त्यामुळे झाडाला जखमा होऊ शकतात. फ्ल्युएन्झिनाम, क्लोरोथॅलोनिल आणि मँकोझेब सारख्या औषधांची बीज प्रक्रिया केल्यास या रोगाची लागण खूप कमी प्रमाणात झालेली आढळून आलेली आहे.
स्ट्रेप्टोमायसेस स्कॅबीज नावाच्या जंतुंमुळे ही लक्षणे उद्भवतात जेजमिनीत संक्रमित मुंळांच्या भागात जगतात. ह्याचा प्रसार पाण्याने, संक्रमित रोपांच्या साहित्याने आणि वार्याने उडणार्या मातीमुळे होतो. हा झाडात भागातुन आणि कंदात मुख्यत्वेकरुन जखमातुन आणि नैसर्गिक छिद्रातुन प्रवेश करतो. कंद वाढण्याच्या वेळी कोरडे आणि उबदार हवामान असल्यास लागणीची जोखिम वाढते. या जिवाणूंना भरपूर प्राणवायुची गरज असते म्हणुन लागण होण्याची शक्यता, मोकळ्या आणि चांगल्या हवेशीर जमिनीत जास्त असते. हे जिवाणू जास्त करुन कोरड्या आणि अल्काच्या जमिनीत सापडतात. बटाट्याच्या वाणाप्रमाणे त्याची एस. स्कॅबीज जंतुची संवेदनशीलता बदलते आणि काही प्रतिकारक रोपातही नैसर्गिक छिद्रे कमी आणि घट्ट असतात तसेच सालही जाड असते.