बटाटा

बटाटा पिकावरील काळी कुज

Pectobacterium atrosepticum

जीवाणू

थोडक्यात

  • खोडाच्या बुडावर पाणी शोषल्यासारखे डाग येतात.
  • कालांतराने वरपर्यंत पोहोचतात.
  • खोडाच्या आतल्या पेशी कुजतात आणि काळ्या होतात.
  • पानांच्या कडा गोळा होतात व पाने पिवळी पडुन मरगळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बटाटा

लक्षणे

काळ्या कुजीचे लक्षण पहिल्यांदा खोडाच्या बुडावर पाणी शोषल्यासारख्या डागांनी दिसते. हे डाग नंतर मोठे होऊन एकमेकात मिसळून गडद होतात आणि वर पर्यंत पोहोचतात. खोडाच्या आतील भाग कुजतो आणि काळा पडतो, ज्यामुळे पाणी आणि पोषकांचा पुरवठा झाडाच्या शेंड्याकडील वरच्या भागात नीटपणे होत नाही. संक्रमित खोडावरील पानांच्या कडा गोळा होतात व पाने पिवळी पडून वाळतात. झाड कोलमडतात किंवा सहजपणे जमिनीतुन उपटता येतात. कंद आणि खोडाजवळचा भाग काळा पडून कुजतो. जसजसा रोग वाढत जातो तसतसा एकतर पूर्ण कंद किंवा फक्त आतील गाभा कुजतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या जिवाणू विरुद्ध कोणतेही जैविक उपचार उपलब्द नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपर मिश्रणे वापरुन ह्या जिवाणूच्या प्रसारास प्रतिबंध करता येतो. तरीपण अशी मिश्रणे पर्यावरणास आणि मानवी स्वास्थ्यासाठी हानीकारक असु शकतात.

कशामुळे झाले

रोगाचा विकास बहुधा बियाणांचा कंद कुजण्याआधीच किंवा रुजल्यानंतर लगेच होतो. ओले हवामान कुजेच्या वाढीस अनुकूल असते. लागवडीच्या ठिकाणी जमिन कडक असणे किंवा पाणी जमा होणे ह्याने काळ्या कुजीला संवेदनशील करते. झाडात जिवाणू कुजलेल्या मुळातुन किंवा जमिनीवरील पाल्यापाचोळ्यातुन आत शिरतात. किडींमुळे किंवा शेतीउपयोगी हत्यारांमुळे झालेल्या जखमेतुन जीवाणुंना आत शिरकाव करता येतो.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासुन धरलेले किंवा प्रमाणित स्त्रोताकडुन घेतलेले बियाणे पेरावे.
  • उपलब्ध असल्यास सहनशील वाणांची निवड करा.
  • लागवडीसाठी संपूर्ण कंदाचा वापर करा व तुकडे लावणे टाळा.
  • जमिनीचे तापमान १० डिग्री सेल्शियसपेक्षा कमी असल्यास लागवड करु नये.
  • पुरेसे खत खासकरुन नत्र द्यावे.
  • २-३ वर्षांसाठी यजमान नसलेल्या पीकांबरोबर पीक फेरपालट करावा.
  • पाण्याचा योग्य निचरा होऊ द्या आणि जास्त पाणी देणे टाळा.
  • शेताचे निरीक्षण करा आणि संक्रमित झाडे काढुन टाका.
  • शेतात काम करताना किंवा काढणी करतेवेळेस झाडांना इजा होऊ नये याची काळजी घ्या.
  • शेतीउपयोगी हत्यारे, गोदाम आणि अवजारे निर्जंतुक करा.
  • पीक घेतल्यानंतर झाडाचे अवशेष काढुन टाका.
  • पीक घेतल्यानंतर जमिन चांगली तापू द्या.
  • बटाट्याची काढणी कोरड्या वातावरणात करावी व त्यांची साठवणूक हवेशीर व तापमानात मोठी तफावत नसलेल्या ठिकाणी करावी.

प्लँटिक्स डाऊनलोड करा