Pseudomonas syringae
जीवाणू
सुरवातीला पानावर बारीक, गोलाकार ठिपके येतात व कालांतराने मोठे, कोणाकृत ते आकारहीन, पाणी शोषलेल्या भागासारखे दिसतात. ओल्या हवामानात पानाच्या खालच्या बाजुच्या डागातुन जीवाणूंचा स्त्राव ठिबकतो. कोरड्या हवामानात हे थेंब वाळून पांढरट पापुद्र्यामध्ये रुपांतरीत होतात. नंतर संक्रमित पिवळे भाग करपून राखाडी होतात आणि आकुंचन पावतात व बहुधा निरोगी पानांच्या पेशींपासुन फाटतात आणि गळतात. या व्रणाची कडा बहुधा पिवळी असते. मोठ्या, बेढब छिद्रांमुळे पाने जीर्ण दिसतात. काही प्रतिकारक वाणात, व्रण बारीक येतात व पिवळी कडा नसते. संक्रमित फळावर बारीक जवळपास गोलाकार ठिपके वरवर दिसतात. जेव्हा संक्रमित भाग वाळतात तेव्हा ती जागा पांढरी पडून फुटते, ज्यामध्ये मग संधीसाधु बुरशीने आणि जिवाणूंनी घर केल्यामुळे संपूर्ण फळ सडते. लहान फळांवर संक्रमण झाल्यास मोठ्या प्रमाणात फळगळ होते.
संक्रमित बियाणे लसणाचा अर्क आणि गरम पाण्यात (५० डिग्री सेल्शियस) ३० मिनीटे भिजत ठेऊन उपचार केला जाऊ शकतो. हरितगृहात पानावरील कोणाकृत ठिपके न होण्यासाठी रात्रीचा दमटपणा नियंत्रित (८०-९० %पर्यंत) केला जातो यासाठी डीह्युमिडीफायर्स वापरले जातात. जैविक नियंत्रक एजंट पेन्टाफेज परिणामकारकरीत्या या पी. सिरिंगेचा नाश करतात. जैविक कॉपर कीटनाशके रोग प्रसाराची गती कमी करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. ज्या बुरशीनाशकात कॉपर हायड्रॉक्साइड असते ते वापरले जाऊ शकते. जेव्हा तापमान २४ अंशाच्या वर असते आणि पाने ओली असतात तेव्हा हे उपचार सर्वात परिणामकारक असतात. जास्त तापमान आणि कोरडी पाने असतेवेळी फवारणी केल्यास झाडांना इजा होऊ शकते. या रोगाच्या नियंत्रणासाठी अठवड्यातुन एकदा फवारणीची गरज लागु शकते.
सुडोमोनाज सिरिंगे या जिवाणूमुळे ही लक्षणे दिसतात, ज्यामुळे सर्व वेलवर्गीय पिके प्रभावित होऊ शकतात. हे संक्रमित बियाण्यात किंवा झाडांच्या अवशेषात २ वर्षांपेक्षा अधिक काळ जिवंत राहु शकतात. जेव्हा आर्द्रता जास्त असते तेव्हा संक्रमित भागांवर जीवाणूंचे पारदर्शक ते पांढरे चिकट पाझरलेले थेंब दिसतात. हे जिवाणू एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मजुरांच्या हाताने, अवजाराने, किडींमुळे किंवा उडणाऱ्या पाण्याच्या थेंबाद्वारे किंवा वाऱ्याने पसरतात. कालांतराने, जीवाणू पानांच्या पृष्ठभागावर (स्टोमाटा) असलेल्या छिद्रांद्वारे झाडामध्ये प्रवेश करतात. जेव्हा फळ संक्रमित होते, तेव्हा जिवाणू फळाच्या गाभ्यात आतपर्यंत जातात आणि बियांना संसर्गित करतात. आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे, तंबाखू नेक्रासिस व्हायरस हा काही प्रमाणात पानावरील कोणाकृत ठिपके देणाऱ्या जिवाणू विरोधात प्रतिकार पुरवितो.