Xanthomonas campestris pv. campestris
जीवाणू
बहुतेक वेळा, कोबीचे नुकसान बहुधा उन्हाळ्यात उशीरा दिसते. मुख्य लक्षण आहे पानांच्या कडांवर पिवळे पाचरीच्या आकाराचे डाग येतात, जे नंतर पानाच्या मध्याकडे पसरतात आणि खाली खोडावरही उतरतात. ह्या लक्षणामुळे काळ्या कुजेला फ्युसॅरियम विल्टपासुन वेगळे काढता येते जिथे लक्षणे जमिनीपासुन खालुन वर खोडाकडे सरकतात. जसजसा रोग वाढत जातो, पानांवरील पिवळा भाग वाढत जातो आणि जशा पेशी मरतात तसे डाग तपकिरी होतात. रोगाच्या अखेरच्या टप्प्यावर पानांच्या शिरा काळ्या पडतात म्हणुन रोगाला हे नाव दिले गेले. अखेरीस पाने कोलमडतात. जंतु खोडातुन शिरुन शिरांमधुन सर्वत्र पसरतो, ज्यामुळे जमिनीजवळचा भाग कापला असता त्यात काळ्या रंगाचे वर्तुळ दिसते.
बियाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ५० डिग्री सेल्शियसच्या पाण्यात ३० मिनीटांसाठी बियांणांना ठेवण्याची शिफारस करण्यात येते. ह्याचा परिणाम काळ्या कुजीसाठी १००% प्रभावी नसतो पण रोगाची घटना खूप कमी होते. पण ह्यामुळे रुजण्याचा दरही कमी होऊ शकतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. शेत दुषित होऊ नये म्हणुन गरम पाण्याने बीजप्रक्रिया केल्यास परिणाम चांगला होतो. कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांची पानांवरील फवारणी दर सात ते दहा दिवसांनी केल्यासही रोगाचा प्रसार हळु होतो. दुर्दैवाने ह्या उपचारांमुळे काळी कुज कोबीच्या पानावर बाहेरच्या बाजुला विकसित होते.
जमिनीत रहाणार्या झँथोमोनोज कँपेस्टिस नावाच्या जंतुमुळे ही लक्षणे उद्भवतात जो संक्रमित पीकाच्या अवशेषात किंवा बियांत सुमारे २ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो किंवा ब्रासिका कुटुंबाच्या तणात फार काळापर्यंत राहू शकतो. कोबी कुटुंबातील पुष्कळ जातींच्या भाज्यांना (ब्रॉकोली, फुलकोबी, सलगम, मुळा, कोल्हाबी वगैरे) लागण करतो. निरोगी झाडांवर जंतु पाण्याच्या थेंबांबरोबर पसरतो आणि वेगवेगळ्या मार्गांनी आणि जखमांतुन पेशीत शिरतो. एकदा का रोपावर संक्रमण झाले मग रोग इतर कोबींवरही झटकन पसरतो. जर जमिन किंवा बिया दूषित असतील तर पहिले लक्षण रोपवाटिकेतच दिसते. उच्च आद्रता आणि २५ ते ३० डिग्री सेल्शियसचे तापमान जंतु आणि संक्रमणाच्या प्रक्रियेसाठी उत्कृष्ट आहे. फार जवळ जवळ लावलेली रोपांमुळे जंतु एका रोपावरु दुसर्या रोपावर पसरण्यात मदत होते. अशा परिस्थितीत, पीकाचे उत्पादन जवळपास ७५-९०%नी कमी होऊ शकते.