इतर

जिवाणुजन्य देवी रोग

Pseudomonas syringae pv. syringae

जीवाणू

थोडक्यात

  • पानांवर पाणी शोषल्यासारखे ठपके येतात.
  • हे डाग नंतर सुकतात आणि गळतात ज्यामळे बंदुकीने गोळी मारल्यासारखा परिणाम दिसतो.
  • गडद तपकिरी, सपाट डाग फळांवर येतात.
  • फांद्यांच्या सालींवर प्रभाव पडतो.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
सफरचंद
जर्दाळू
चेरी
पीच
अधिक

इतर

लक्षणे

पानांवरील संक्रमणात छोटे, गोल, पाणी शोषल्यासारखे, सुमारे १-३ मि.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. जशी पाने मोठी होतात, हे डाग तपकिरी, कोरडे आणि ठिसुळ होतात. अखेरीस संक्रमित भाग गळुन पडतात आणि बंदुकीने गोळी मारल्यासारखा परिणाम दिसतो किंवा फाटल्यासारखे दिसते. चपटे, वरवरचे, गडद तपकिरी डाग संक्रमित फळांवर येतात. त्याखालील भाग गडद तपकिरी ते काळा होतो आणि काही वेळा स्पंजासारखा होतो. संक्रमित फुले पाणी शोषल्यासारखी दिसतात, तपकिरी होतात, मरगळतात आणि काटकीला लटकुन रहातात. वैशिष्ट्यपूर्ण कँकर्स संक्रमित भागाच्या बुडाशी होतात ज्याबरोबर सहसा चिकट स्त्राव दिसतो. संक्रमित भाग थोडे खोलगट आणि गडद तपकिरी असतात. हिवाळ्यात उशीरा किंवा वसंत ऋतुच्या सुरवातीला कँकर्स पहिल्यांदा लक्षात येतात. वसंत ऋतुत कँकर्स खळ तयार करतात जी खोडाच्या सालीच्या आत जाते. हिवाळ्यातील कँकर्सही तसेच असतात पण बहुधा मऊ, ओलसर, खोलगट आणि आंबट वास येणारे असतात. जर संक्रमणाने वेढले तर फांदीची मर झपाट्याने होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

कॉपर संयुगे असलेले सेंद्रिय जंतुनाशक किंवा बोर्डो मिश्रणाने शरद आणि वसंत ऋतुतील रोगाच्या कँकर टप्प्याचे नियंत्रण परिणामकारकपणे केले जाऊ शकते. रिंग सूत्रकृमींचे नियंत्रण करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जंतुजन्य कँकरचा परिणामकारक उपचार करण्यासाठी, कॉपर जंतुनाशकांची शिफारस केली जाते. फेरिक क्लोराइड किंवा मँकोझेबला क्युप्रिक हायड्रोक्साइड सह मिसऴल्यास ज्या प्रजातींनी काही वर्षांमध्ये प्रतिकार निर्माण केला आहे त्याचे नियंत्रण चांगले केले जाते.

कशामुळे झाले

जंतुजन्य कँकर हा रोग फार जवळचा संबंध असलेल्या दोन जंतुंमुळे होतो जे प्लम, चेरी, आणि प्रुनस जातीशी संबंधीत झाडांच्या पानांना संक्रमित करतात. हे जंतु बहुधा पानांच्या पृष्ठभागावर रहातात. वसंत ॠतुतील किंवा उन्हाळ्याच्या सुरवातीच्या ओल्या हवामानात, ते पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन आत शिरतात आणि कोवळ्या पानांत संक्रमण विकसित करतात. जसे ते पान मोठे होते, हे संक्रमित रोगट भागांचे छोटे भाग हळुहळु सुकु लागतात. पानांच्या वाढत रहाण्यामुळे ह्या मृत भागांचे फाटणे आणि गळणे होते. जेव्हा जंतु जखमातुन किंवा पानगळीच्या वेळी पानांवरील ओरबड्यांतुन आत शिरतात त्या फुटव्यावर कँकर्स विकसित होतात. पूर्ण उन्हाळ्यात, जेव्हा भाग प्रतिकारक असतात आणि शरद ऋतुत आणि हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी असते तेव्हा कँकर्स बहुतेक सुप्तावस्थेत रहातात. वसंत ऋतुत, जंतुंची वाढ सुरु होते आणि संक्रमण झपाट्याने पसरते, ज्यामुळे खोडाच्या सालीची मर होते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित रोपवाटिकेतील रोपे किंवा बियाणेच वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास लवचिक वाण लावा.
  • आर्द्रता कमी करण्यासाठी वार्‍याच्या जागा निवडा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • खूप नत्रयुक्त खते टाळा पण तरीही खते प्रमाणाच्या गरजेनुसार द्या.
  • कँकर झालेले भाग निरोगी लाकडापर्यंत छाटा.
  • काढणीनंतर लगेच छाटणी करा म्हणजे जखमा चांगल्या भरतील.
  • दोन्ही बाबतीत छाटणीच्या जखमांना बुजवुन योग्य रंग लावा.
  • संक्रमित झाडाची सामग्री जाळुन किंवा जमिनीत भर म्हणुन घालण्यासाठी फेकुन द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा