ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीवरील जीवाणुजन्य करपा

Xanthomonas sp.

जीवाणू

थोडक्यात

  • कोवळ्या पानांवर बारीक, पिवळे हिरवे डाग उमटतात.
  • जुन्या पानांवर पिवळ्या कडांचे गडद, पाणी शोषल्यासारखे डाग दिसतात.
  • पाने पीळ पडुन विकृत आकाराची होतात.
  • फळांवर पाणी शोषल्यासारखे भाग येऊन खडबडीत, तपकिरी होऊन खपली धरतात.

मध्ये देखील मिळू शकते


ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

पहिली लक्षणे कोवळ्या पानांवर जी बहुधा विकृत आकाराची आणि पीळ पडल्यासारखी असतात, त्यावर बारीक, पिवळे हिरवे डाग उमटतात. जुन्या पानांवर डाग थोडे कोणेदार, गडद हिरवे आणि दिसायला तेलकट असतात आणि त्यांच्या भोवती पिवळी वर्तुळे दिसतात. ते बहुधा पानांच्या कडा आणि टोकांवर मोठ्या प्रमाणात आढळतात. कालांतराने, हे ठिपक्यांचे केंद्र वाळून गळून पडल्यामुळे बंदुकीने गोळी झाडलेल्या छिद्रासारखे दिसतात. फळांवरील डाग (०.५ सें.मी. पर्यंत) फिकट हिरवे, पाणी शोषलेले भाग म्हणून सुरू होतात, जे अखेरीस खडबडीत, तपकिरी आणि खपलीसारखे होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जिवाणुजन्य करप्याचा उपचार फारच कठिण आणि खार्चिक आहे - जर रोग हंगामाच्या सुरवातीलाच झाला, तर संपुर्ण पीक काढून टाकण्याचा विचार नक्की करा. कॉपर असणारे जिवाणुनाशक पानांना आणि फळांना सुरक्षा आवरण देतात. जिवाणुजन्य विषाणू (बॅक्टेरियोफेजेस) जे खास करुन जिवाणुंना मारतात ते उपलब्ध आहेत. बियाणे एका मिनिटासाठी १.३% सोडियम हायपोक्लोराइटमध्ये किंवा २५ मिनीटांसाठी(५० डिग्री सेल्शियस तापमानाच्या) गरम पाण्यात बुडवुन ठेवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपरयुक्त जिवाणूनाशक संरक्षक म्हणून वापरले जाऊ शकते आणि आंशिक रोग नियंत्रण देऊ शकते. रोगाची पहिली लक्षणे दिसताक्षणी आणि त्यानंतर १० ते १४ दिवसांच्या अंतराने उबदार, ओलसर परिस्थितीत वापर करावा. कॉपर आणि मँकोझेबमधील सक्रिय घटक चांगले संरक्षण देतात.

कशामुळे झाले

जिवाणुजन्य करपा जगभरात सापडतो आणि खासकरुन उबदार आणि आर्द्र वातावरणात लागवड केलेल्या मिरची आणि टोमॅटोवरील नुकसानदायक रोग आहे. जिवाणू बियाण्याच्या आत किंवा बाहेर आणि काही विशेष प्रकारच्या तणावर जगतात व कालांतराने पाऊस किंवा तुषार सिंचनाने पसरतात. झाडाच्या पानातील नैसर्गिक छिद्रातुन आणि जखमांतुन तो आत शिरतो. २५ ते ३० अंश सेल्शियसचे तापमान करप्याला फार अनुकूल असते. एकदा का पिकावर संक्रमण झाले कि मग रोगाचे नियंत्रण करणे फार कठिण आहे आणि पूर्ण पिकाचे संपूर्ण नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित रोगमुक्त बियाणे वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • कोणत्याही रोपावर जिवाणुजन्य करपा दिसल्यास ती रोपे आणि आजुबाजुची रोपे काढून जाळा.
  • शेतात आणि आजुबाजुने तण नियंत्रण चोखपणे करा.
  • रोपाखाली अच्छादन वापरल्यास जमिनीतुन झाडांवर होणारे संक्रमण टाळता येते.
  • वेगवेगळ्या शेतात वापर करण्यापूर्वी अवजारे आणि हत्यारे साफ करा.
  • तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे टाळा आणि जेव्हा रोपे ओली असतात तेव्हा शेतात काम करणे टाळा.
  • पीक घेतल्यानंतर रोपांचे अवशेष खोल नांगरुन गाडुन टाका किंवा काढुन जाळा.
  • दर २-३ वर्षांनी संवेदनशील नसणार्‍या पीकासह फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा