Pseudomonas syringae pv. syringae
जीवाणू
खालील पानांवर पिवळट हिरव्या रंगाची अर्धपारदर्शक रंगहीनता मध्यशिरेला लागुन दिसते. हळुहळु ती वरील पानांमध्ये देखील दिसु लागते. अनुकूल हवामानात हे व्रण आडव्या पद्धतीने लांब होऊन एकमेकांत मिसळतात. प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात लागण झालेल्या भागातुन काहीवेळा जीवाणुंचा स्त्राव होऊ शकतो. काही काळानंतर पानांच्या मध्यभागातील पट्टे करपून सुकतात व गळुन पडतात, त्यामुळे पाने फाटल्यासारखी दिसतात. काही संवेदनशील वाणात संपूर्ण पानावर करपट पट्टे पसरतात आणि झाडांच्या शेंड्याकडील भाग विकृत होतात.
आजपर्यंत कोणतेही परिणामकारक जैव उपचार उपलब्ध नाहीत. मक्यातील जंतुजन्य ठिपक्याच्या नियंत्रणाचे पर्यायी उपचार हे प्रतिबंधक उपाय आणि शेतीच्या चांगल्या सवयींपर्यंतच मर्यादित आहेत.
नेहमी एकात्मिक उपद्रव किंवा रोग व्यवस्थापन करा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सध्या तरी रसायनिक उपचार फक्त कॉपर किंवा कॉपरसह इतर उत्पादांपुरतेच मर्यादित आहेत. बहुतेक फवारे फक्त थोडेच परिणामी असल्याने गंभीर प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करणे अतिशय कठिण आहे.
लक्षणे शक्यतो जीवाणूची संख्या, लागवड केलेले मक्याचे वाण व हवामानावर अवलंबुन असतात. जीवाणू जमिनीतील पीकाच्या अवशेषात, बऱ्याच पर्यायी यजमानात आणि तणात आणि स्वयंभू झाडात जिवंत रहातात. ह्या रोगाचा प्रसार सिंचनाच्या पाण्याने, वार्याने किंवा काम करणार्यांदवारे आणि शेती उपयोगी अवजारांतुन होते. जीवाणु पानांच्या नैसर्गिक छिद्रांतुन किंवा जखमांतुन आत शिरुन संसर्ग करतात. ०-३५ डिग्री सेल्शियसचे तापमान हे सहन करु शकतात पण २५-३० डिग्री सेल्शियसचे तापमान फोफावतात. दमट हवामानात हा रोग आणखीनच बळावतो. जर रोगाचा प्रादुर्भाव लवकरच झाला तर काही शेतकरी पूर्ण पिकच नष्ट करण्याचा पर्याय निवडतात.