Erwinia amylovora
जीवाणू
आग करप्याचे वैशिष्ट्य आहे कि पानांवर, फुलांवर, फळांवर आणि कोंबांवर पुष्कळशी लक्षणे दिसतात. पाने आणि फुले सुकु लागतात आणि झटकन हिरवी राखाडी होतात आणि नंतर तपकिरी किंवा काळी होतात. पूर्ण मोसमात ते फांद्यांना चिकटुनच रहातात. वाढणारे फुटवेही हिरवे राखाडी होतात, सुकतात आणि वाकतात ज्यामुळे "गुराख्याच्या काठी"सारखे दिसतात. जसा रोग वाढत जातो तशी जास्त कोंब आक्रसतात आणि मरतात. गंभीर संक्रमण झाल्यास झाडे आगीने होरपळल्यासारखी दिसतात, ज्यामुळे ह्या रोगाचे हे सामान्य नाव आहे. फांद्यांवर कँकर्स येतात ज्यामुळे त्यांचा रंग गडद होतो आणि साली खोलगट जाऊन त्यांना चिरा पडतात. मेलेल्या सालीच्या खाली, लाकडावर लालसर तपकिरी रंगाच्या छटा दिसतात. ऊबदार, आर्द्र हवेत, रोपाच्या संक्रमित भागातुन चिकट पांढरा पदार्थ पाझरतो. जर उपचार केले गेले नाहीत तर संक्रमण मुळांपर्यंत पोचते आणि पूर्ण झाडच मरु शकते.
बोरडॉक्स मिश्रण किंवा इतर कॉपर उत्पाद (सुमारे ०.५%) फुलधारणेच्या वेळी पुष्कळ वेळा वापरल्यास नविन संक्रमण कमी होऊ शकते. खाली दिलेल्या हवामान परिस्थितीप्रमाणे वेळेवर वापर करण्याची शिफारस करण्यात येते. जास्त आर्द्रता असताना चार ते पाच दिवसांच्या अंतराने वापर करावा. काही कॉपर उत्पाद फळांच्या पृष्ठभागावर व्रण देतात ह्याची खबरदारी घ्या. स्ट्रेप्टोमायसेस लिडिकस असणार्या उत्पादांचा वापरही जंतुंचा प्रसार कमी करतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आग करप्याचे नियंत्रण करताना फुलधारणेच्या काळात कॉपर उत्पादांचा वापर केला जाऊ शकतो. तरीपण, जास्त वापरही पुरेसे नियंत्रण पुरवित नाही. छाटताना उपकरणांना १०% ब्लीच द्रावणाने किंवा जंतुविरोधी सफाई द्रावणाने निर्जंतुक करावे.
एरविनिया अॅमिलोव्होरा नावाच्या जंतुंमुळे आग करपा होतो जो सफरचंद, पेयर्स आणि त्याच कुटुंबातील शोभेच्या झाडांना संक्रमित करतो. प्लम्स, चेरी, पीच आणि नेक्टराइनसारखी स्टोन फळांना हा रोग होत नाही. वसंत ऋतु ते शरद ऋतुपर्यंत नुकसान दिसते. काटक्या, फांद्या किंवा खोडातील कँकर्समध्ये जंतु विश्रांती घेतो. वसंत ऋतुतील अनुकूल परिस्थीतीत आतील भागात त्याची वाढ सुरु होते, ज्यामुळे त्या भागांचा रंग तपकिरी होतो. ह्यामुळे पाणी आणि पोषकांचे वहन होत नाही आणि कोंबांची टोके सुकतात, जी अखेरीस खाली मुडपतात. पावसाचे उडणारे पाणी किंवा किडे ह्या जंतुंचे वहन जवळपासच्या उमललेल्या फुलांवर किंवा झपाट्याने वाढणार्या फ़ुटव्यांवर करतात. जमिनीची जास्त सुपिकता आणि आर्द्रतासुद्धा नुकसानाची गंभीरता वाढविते. ऊबदार परिस्थितीत किंवा जखमा झाल्यास संक्रमणास अनुकूल असते.