वाटाणा

वाटाण्यावरील घुबडा मोझाईक विषाणू

PEMV

विषाणू

थोडक्यात

  • पिवळसर, अर्धपारदर्शी किंवा करपलेले भाग दिसतात.
  • पाने विकृत आकाराची होतात, झाड बेढब होते.
  • पानांच्या खालच्या बाजुला अतिरिक्त बाहेरची वाढ दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
हरभरा
मसूर
वाटाणा

वाटाणा

लक्षणे

ह्याचे प्रमुख लक्षण आहे अतिरिक्त वाढ, जी पानांच्या खालच्या बाजुला स्पष्ट असते. लागण झाल्यानंतर ५-७ दिवसात वरील पाने खालच्या दिशेने गोळा होतात. ह्यानंतर शिरा स्पष्टपणे साफ झालेल्या दिसतात आणि पिवळसर बेढब ठिपके उमटु लागतात तसेच छोटे अर्धपारदर्शी डाग पानांच्या पृष्ठभागावर येतात. शेंगांचा आकार आणि प्रत ह्यावर गंभीर प्रभाव पडतो ज्यामुळे उत्पन्नाचे नुकसान होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

लागवडीसाठी प्रतिकारक वाण लावा. पिवळे चिकट सापळे लावुन माव्यांच्या लोकसंख्येचे नियंत्रण करा. मका, ज्वारी किंवा बाजरी सारखी उंच वाढणारी कुंपण पिके लावुन माव्यांची लोकसंख्या कमी करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. माव्यांच्या लोकसंख्येचे निरीक्षण करा आणि योग्य वेळ साधण्यासाठी फक्त मान्य कीटकनाशकांचाच वापर करा.

कशामुळे झाले

मोझाईक विषाणूमुळे (ल्युटियोव्हिरिडे) नुकसान होते आणि ह्या रोगाचा प्रसार माव्याद्वारे (अॅसिर्थोसिफॉन पयसम आणि मयझस ऑर्नॅटस) होतो. विषाणूंचे वहन करण्यात प्रौढांपेक्षाही अळ्या जास्त कार्यक्षम असतात. घटनेची गंभीरता ही यजमान झाडाचे वय आणि पर्यावरण परिस्थितीवर अवलंबुन असते.


प्रतिबंधक उपाय

  • लागवडीच्या आधी रोपांची माव्यांसाठी तपासणी करा.
  • माव्याचे नियंत्रण करा.
  • पर्यायी यजमानांचे काम करणारी बारमाही आणि वार्षिक शेंग झाड, तणांच्या प्रजाती ज्यांत पीईएमव्ही आणि मावा दोघेही दीर्घकालीन विश्रांती घेतात ती काढुन टाका.
  • वाहक किडीच्या लोकसंख्येचे व्यवस्थापन करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा