तंबाखू

तंबाखूवरील मुरडा रोग

Tobacco leaf curl disease

विषाणू

थोडक्यात

  • प्रादुर्भावित पाने आकाराने लहान, खालच्या दिशेने मुडपुन गोळा झालेली असतात.
  • शिरा सुजतात आणि झाडे बहुधा खुजी होतात.

मध्ये देखील मिळू शकते


तंबाखू

लक्षणे

प्रादुर्भावित झाडांची पाने जाड, खालच्या दिशेने गोळा झालेली, शिरा सुजलेल्या तसेच झाडे खूजी असल्याची चिन्हे दर्शवितात. झाडांची उंची कमी भरते आणि पेरेही लहानच असतात. पानांच्या खालच्या बाजुने शिरांच्या लगत पुष्कळशा बुंध्यासारख्या रचना बाहेर विकसित होतात. पाने हिरवी पडतात आणि शिरा जाड होतात ज्यामुळे पानांच्या वरील पृष्ठभागावर खळगे तयार होतात. फुलोराही खुजाच रहातो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

प्रादुर्भावाच्या घटना कमी करण्यासाठी वाहक लोकसंख्येचे नियंत्रण करा. सूर्यफुले आणि एरंडासारखी अडथळा पिके तंबाखू रोपाटिकेच्या सभोवताली लावा. तसेच रोपवाटिकेस नायलॉनच्या जाळीने आच्छादित करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रादुर्भावाच्या घटना आणि प्रसार कमी करण्यासाठी जमिनीत किंवा झाडीवर अॅसेफेटचा वापर करा. फुराडान (कार्बोफ्युरान) वापरुन अलिरॉडिड वाहकांना नष्ट करा.

कशामुळे झाले

जेमिनिव्हिरिडे कुटुंबातील बेगोमो नावाच्या विषाणूंमुळे हानी होते. विषाणूंचा प्रसार बेमिसिया टाबाकि नावाच्या पांढर्‍या माशीमुळे होतो. विषाणूंचे नैसर्गिक स्त्रोत झाडे अनेक असल्याने, विषाणू यजमान झाडास प्रादुर्भावित करुन वाहकांद्वारे भरपूर नैसर्गिक स्त्रोत झाडांवर झपाट्याने पसरतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रादुर्भावित झाडे काढुन टाका.
  • निरोगी झाडांवर पातळ कपड्याचे आच्छादन घाला.

प्लँटिक्स डाऊनलोड करा