Sugarcane Yellow Leaf Virus
विषाणू
ऊसावरील हळद्या रोग संक्रमणाच्या गंभीर लक्षणात ऊसाची वाढ खुंटणे, पाने रंगहीन होणे आणि झाड झुडपासारखे दिसणे येतात. शेंड्यावरच्या फुटलेल्या वाढत्या पानापासुन खालती मोजणी करताना ३ ते ६ व्या पानांच्या खालच्या बाजुची मध्यशीर पिवळी पडते. जसजसा काळ पुढे जातो तसतसा पिवळेपण पानाच्या मध्यापासुन सुरु होऊन पानांच्या कडांपर्यंत पोहोचते आणि हे पिवळेपणा मोठ्या अंतरावरून देखील ओळखता येते. तयार झालेल्या ऊसात हे खूप लवकर लक्षात येते. गंभीर संक्रमण झाले असता, शेंड्यावर वाढणारे मुख्य पान इतर पानांसह वाळते आणि शेंडा झुडपासारखा दिसु लागतो. काहीवेळा लालसर रंगहीनताही दिसुन येते. परिपक्व ऊसामध्ये, हा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो आणि दूरवरून ओळखला जातो. हे लक्षात ठेवले पाहिजे कि लक्षणे इतर कारणांशीही म्हणजे झाडावरील ताण, किड्यांनी केलेले नुकसान किंवा पाण्याची कमतरता संलग्न असु शकतात.
विषाणूंचे वहन करणार्या माव्याच्या लोकसंख्येचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. माव्यासाठी पानांच्या खालच्या बाजु तपासा आणि जर सापडलेच तर लगेच कीटकनाशक साबण, नीम तेल किंवा पायरेथ्रॉइड वर आधारीत सेंद्रीय उत्पादांचे उपचार करा. माव्याला खाणारे भक्षक देखील वापरले जाऊ शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. वाहक किड्यांद्वारे होणार्या दुय्यम संक्रमणाचा प्रतिबंध करण्यासाठी मॅलेथियॉन ०.१% किंवा डायमेक्रॉन ०.२% याप्रमाणे वापर करा. वाळलेली पाने काढल्यानंतर मॅलेथियॉन १.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे महिन्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. कार्बोफ्युरान २ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनीत वापरावे.
ऊसावरील हळद्या विषाणू रोगामुळे, ज्यांचे वहन मावाद्वारे (मेलानाफिस सॅच्चारी आणि र्होरपालोसिफम माइडिस) करुन दुय्यम संक्रमण करवितात किंवा ऊसाची पाने पिवळी पाडणारी फयटोप्लाझ्मा नावाची बुरशी (एससीवायएलपी) जिचे वहन तुडतुडे करतात यांच्यामुळे लक्षणे उद्भवतात. या रोगाचे वहन प्रामुख्याने ऊसाच्या संक्रमित कांड्यांद्वारे होते आणि इतर कोणत्याही मार्गाने होत नाही. गहू, जव, ज्वारी आणि ओटस देखील या रोगास संवेदनशील आहेत पण जर ऊसाची लागवड जवळपास केलेली असेल तरच प्रभावित होतात. पक्व ऊसात काढणीपर्यंत जर कोरडे हवामान राहिले तर रोग लक्षात येत नाही.