भेंडी

भेंडीवरील विषाणूजन्य हळद्या रोग

BYVMV

विषाणू

थोडक्यात

  • या विषाणूजन्य रोगामुळे भेंडीच्याउत्पादनाचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
  • हा रोग पिकाच्या सर्व टप्प्यांवर होऊ शकतो आणि याचा प्रसार पांढर्‍या माशीमुळे (बेमिशिया टॅबासी) होतो.
  • पिवळ्या शिरा आणि ठिगळा सारखी संरचना पानांवर दिसते.
  • जर संक्रमण पिकाच्या सुरवातीच्या टप्प्यात झाले तर फळधारणा ९६%पर्यंत कमी होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भेंडी

लक्षणे

रोगाचे वैशिष्ट्य विविध पातळीवरील पिवळेपणा आणि लहान किंवा मोठ्या शिरांचे पिवळे पडणे तसेच आलटुन पालटुन हिरव्या आणि पिवळ्या धब्ब्यांची ठिगळ संरचना दिसणे, पाने बारीक रहाणे, फळे कमी आणि लहान लागणे तसेच झाडाची वाढ खुंटणे आहे. सुरवातीला संक्रमित पानातील शीराच फक्त पिवळ्या पडतात पण नंतर पूर्ण पानच पिवळे पडते. जर उगवल्यानंतर २० दिवसातच रोपावर संक्रमण झाले तर ती रोपे खुजीच रहातात. जर कोवळ्या पानांवर हंगामाच्या सुरवातीलाच संक्रमण झाले तर ती पूर्णपणे पिवळी, तपकिरी होऊन वाळतात. फुलधारणेनंतर संक्रमण झाल्यास झाडाची वरील पाने आणि फुलांच्या भागतील शिरा साफ होण्याची लक्षणे दिसणे हे वैशिष्ट्य आहे. झाडांना तरीही काही फळे लागतात पण ती पिवळी आणि कडक राहतील. हंगामाच्या शेवटपर्यंत झाडाची वाढ सामान्य होऊन फळधारणा होत होती त्यांच्या खालील भागात लहान फांद्या येतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

५% निंबोळी अर्क किंवा आले, लसुण आणि मिरचीचा अर्काच्या फवारणीने वाहक मर्यादित करता येतात. निवडुंगाचे कापलेले तुकडे किंवा मिल्क बुशचे तुकडे पाण्यात बुडवुन (तरंगण्याइतके पाणी) १५ दिवस आंबु द्यावेत. नंतर गाळुन त्याची फवारणी प्रभावित झाडांवर करावी. नीम आणि मोहरीचे तेल, ऱ्हायझोबॅक्टेरिया, क्रोझोफेरा तेल व त्या नंतर पाल्मारोजा तेलचा वापर करा. तेल ०.५% आणि ०.५% धुण्याचा साबण यांचे मिश्रण वापरल्यानेही मदत मिळते असे अहवाल आहेत.

रासायनिक नियंत्रण

रसायनिक उपचारांनी विषाणूचे नियंत्रण पूर्णपणे केले जाऊ शकत नाही. म्हणुन एकात्मिक दृष्टीकोन ठेऊन प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. काही ठराविक पांढर्‍या माशीचा गट आणि रोगांविरुद्ध कीटकनाशकांचा वापर जमिनीत लवकर करणे ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. पांढरी माशी सर्वच कीटनाशकांविरुद्ध झपाट्याने प्रतिकार निर्माण करते म्हणुन विविध द्रावणे आलटुन पालटुन वापरण्याची शिफारस केली जाते. अॅसेटामिप्रिड २० एसपी ला ४० ग्राम प्रति हेक्टर याप्रमाणे वापरल्यास या रोगाची घटना कमी होण्यात आणि नंतर भेंडीचे उत्पादन वाढण्यात प्रभावी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल चा वापर दोन वेळा आणि एक बीजप्रक्रिया (इमिडाक्लोप्रिड ५ ग्राम प्रति किलो बियाणे दराने) केल्यास उपद्रवाची लोकसंख्या सुमारे ९०.२%पर्यंत कमी होते.

कशामुळे झाले

बेगोमो विषाणूमुळे नुकसान उद्भवते ज्याचे वहन पांढर्‍या माशीद्वारे होते. विषाणूंचे प्रजोत्पादन वाहकांत होत नाही पण प्रौढ पांढर्‍या माशीद्वारे ते झपाट्याने एका झाडातून दुसऱ्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारे पसरतात. पांढर्‍या माशीच्या माद्या विषाणूंचे वहन करण्यात नरांपेक्षा जास्त कार्यक्षम असतात. वाढीच्या सर्वच टप्प्यांवर विषाणूजन्य रोगाची लागण होऊ शकते पण ३५-५० दिवसाचे वय हे जास्त संवेदनशील असते. पांढर्‍या माशीची लोकसंख्या आणि विषाणूंची गंभीरता यावर तापमानाचा, आर्द्रतेचा प्रभाव असतो आणि किमान तापमान २०-३० अंश असते. दुसरा सर्वात महत्वाचा वाहक हा भेंडीवरील तुडतुडा (अमरास्का डिव्हास्टान्स) आहे.


प्रतिबंधक उपाय

  • परभणी क्रांती (अर्क अभय, वर्षा, उपहार) आणि अर्क अनामिकासारखी प्रतिकारक वाण लावा.
  • लागवडीचे अंतर योग्य ठेवा.
  • मका किंवा झेंडूसारखी अडथळा पिके शेताच्या सर्व बाजूने लाऊन वाहक किडींना अडवा.
  • उन्हाळ्यातील लागवड टाळा कारण हा पांढर्‍या माशीच्या उच्चीचा हंगाम असतो.
  • उन्हाळ्यात संवेदनशील वाणांची लागवड टाळा जेव्हा पांढरी माशी जास्त कार्यरत असते.
  • झाडाच्या उंचीवर पिवळे चिकट सापळे (१२ प्रति एकर) लावुन वाहक किडींचा निरीक्षण करुन त्यांना पकडा.
  • शक्य झाल्यास तण आणि इतर जंगली यजमान खास करुन क्रोटॉन स्पार्सिफ्लोरा आणि अगेरालियम प्रजाती नष्ट करा.
  • शेतातुन प्रभावित झाडे काढुन जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा