AMV
विषाणू
पानांवर ठळक पिवळे ठिपके किंवा मोझाईक धब्बे येतात ज्यामुळे तांबट रंगहीनता होते. फळांवर वाळलेली वर्तुळे आणि ठिपके विकसित होतात. झाडाच्या पानांपासुन खाली, मुळांपर्यंत साखर साठवण आणि चयायचय क्रिया करणारे भाग वाळतात ज्यामुळे झाडची मर होते.
रुपेरी परावर्तन करणारी मुल्च (आच्छादने) वापरुन माव्यांद्वारा विषाणूंच्या प्रसारास उशीर करा आणि ज्यामुळे विषाणूंचा प्रसार करणार्या माव्यांना पळवुन लावुन रोगाच्या घटना तसेच गंभीरताही कमी करा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सध्यातरी कोणतीही प्रभावी रसायनिक नियंत्रण पद्धत उपलब्ध नाही. विषाणू वाहक माव्याचे नियंत्रण करण्यात प्रभावी कीटकनाशकेही निष्प्रभ ठरतात.
बियाणेजन्य विषाणूंमुळे नुकसान उद्भवते जे यजमान झाडांवर किंवा संक्रमित बियाणांत जगतात. जेव्हा संक्रमित झाडांवरुन मावा विषाणूंचे वहन निरोगी झाडांवर अविरतपणे करतात तेव्हा दुय्यम संक्रमण होते. एकदा का माव्याने विषाणूला उचलले कि मग ते त्या विषाणूचे वहन अत्यंत थोड्याच काळासाठी करु शकतात आणि प्रसार खूप झपाट्याने आणि स्थानिकरीत्याच होतो.