कापूस

कपाशीवरील लीफ कर्ल व्हायरस (बोकड्या किंवा घुबड्या)

CLCuV

विषाणू

थोडक्यात

  • कपाशीवरील लीफ कर्ल व्हायरसचे (बोकड्या किंवा घुबड्या) वहन पांढरी माशीमुळे होते.
  • पानांच्या कडा वरच्या दिशेने मुडपणे आणि पानाच्या खालच्या बाजुला पानाच्या आकाराचीच फसवी वाढ दिसणे हे या रोगाचे वैशिष्ट्ये आहेत.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

पाने वरच्या दिशेने मुडपणे हे कपाशीवरील लीफ कर्ल व्हायरसचे (बोकड्या किंवा घुबड्या) प्राथमिक लक्षण आहेत. त्यासह पानांच्या शिरा जाड आणि गडद होतात आणि फसवी वाढ खासकरुन पानांच्याच आकाराची पानांच्या खालच्या बाजुला येते. फुल उमलत नाहीत व बोंडांसकट गळतात. जर हंगामाच्या सुरुवातीलाच या रोगाची लागण झाल्यास झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात मोठी घट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पांढरी माशीची लोकसंख्या सामान्यपणे नैसर्गिक शत्रुंद्वारे (उदा. लेसविंग्ज, बिग आय बग्ज, मायन्युट पायरेट बग्ज) नियंत्रित करता येते म्हणुन रसायनिक कीटनाशके अविचारीपणे वापरुन यांचा नायनाट करु नका. नीम तेल किंवा पेट्रोलियमवर आधारीत तेले वापरली जाऊ शकतात आणि यांचा संपूर्ण झाडावर खासकरुन पानांच्या खालच्या बाजुला चांगला थर बसला पाहिजे. अलिकडील संशोधनात असे दिसले आहे कि जैविक नियंत्रकाच्या उदा. वेगळ्या काढलेल्या मित्र जंतुंचे विविध प्रकार (बॅसिलस, स्युडोमोनाज आणि बुरखोल्डेरिया) वापराची वापर संभावितता वाढवुन विषाणूच्या घटना कमी करता येतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कपाशीवरील लीफ कर्ल विषाणूचा प्रतिबंध किंवा कमी करण्यासाठी कोणतीही ज्ञात पद्धती नाहीत. कीटनाशकांच्या रुपात इमॅडाक्लोप्रिड किंवा डायनोटेफ्युरानसारखे रसायनिक नियंत्रण वापरुन पांढरी माशीची लोकसंख्या कमी करता येते. किटनाशकांचा वापर फार सावधगीरीने करावा लागतो कारण जास्त वापर झाल्यास पांढरी माशीच्या प्रजाती प्रतिकार निर्माण करतात. प्रतिकार होऊ नये म्हणुन कीटनाशके बदलत रहावे.

कशामुळे झाले

मुख्यत: पांढरी माशीद्वारे वहन झालेल्या कपाशीवरील लीफ कर्ल विषाणूमुळे लक्षणे उद्भवतात. रोगाचा प्रसार हा काही प्रमाणात वार्याढच्या त्याकाळी असणार्या् झोतावर ठरतो, ज्यावरुन लक्षात येते कि पांढरी माशी किती दूरवर प्रवास करु शकते. पांढरी माशी हंगामाच्या मध्यापासुन ते उशीरापर्यंत खूप मोठी समस्या निर्माण करतात. हा रोग सावली देणार्याय झाडांशीही संलग्नित आहे. रोग बियाणेजन्य नसल्याने विषाणू जागेतील पर्यायी यजमान (तंबाखू आणि टोमॅटो) आणि तणात जगतात. नुकताच झालेला पाऊस, संक्रमित रोप आणि तणांची उपस्थिती हे या रोगाच्या वाढीस अनुकूल असे काही अतिरिक्त घटक आहेत. २५-३० अंश तापमानात विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते. रोपवाटिकेत रोपावस्थेत आणि वाढीच्या काळात कपाशीची रोपे संक्रमणास जास्त संवेदनशील असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित रोगमुक्त बियाणे वापरा आणि सुदृढ रोपांचीच लागवड करा.
  • पांढरी माशीची लोकसंख्या नियंत्रित करा आणि कोवळ्या रोपांना त्यांच्यापासुन सुरक्षित ठेवा.
  • शेतात आणि आजुबाजुची जागा तण मुक्त करा.
  • पर्यायी यजमानांजवळ कपाशीची लागवड टाळून योग्य पीक फेरपालट करा.
  • काढणीनंतर खोल नांगरणी करून झाडांचे सर्व अवशेष नष्ट करा किंवा जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा