ढोबळी मिरची आणि मिरची

मिरचीवरील काकडी मोझाइक विषाणू

CMV

विषाणू

थोडक्यात

  • पानांवर आणि फळांवर मोझाइक नक्षी दिसते.
  • फळांवर तपकिरी डाग आणि क्लोरोटिक धब्बे दिसतात.
  • पाने आणि देठ विकृत तसेच चुरसतात.
  • वाढ खुंटते आणि फुलांवर पांढर्‍या छटा दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

कोणते वाण संक्रमित झाले आहे आणि पर्यावरणीय परिस्थिती ह्याप्रमाणे लक्षणे खूप बदलु शकतात. काही वेळा विषाणू उपस्थित असतो पण लक्षणे छुपी किंवा दडलेली असतात. संवेदनशील वाणात पिवळसर धब्बे किंवा फिकट हिरवे आणि पिवळे विखुरलेले ठिपके पानांवर आणि फळांवर दिसतात. काही वाणात स्पष्ट दिसणारे वलयांकित ठिपक्यांची नक्षी किंवा सुकलेली रेषा दिसते. कोवळी पाने चुरमडलेली आणि अरुंद असतात आणि झाडी फिकट हिरवी असुन खडबडीत दिसते. पूर्ण रोपाची वाढ खुंटलेली असते आणि विकृत असते, झुडपासारखी दिसतात आणि बहुधा वांझ असतात. जर ती विकसीत झालीच तर फळांवर भरपूर तपकिरी गोलाकार डाग क्वचित पिवळ्या प्रभावळीसकट, असतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

खनिज तेलांचे फवारे मारल्यास ते माव्यांना खाण्यापासुन परावृत्त करतात आणि म्हणुन लोकसंख्या कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सीएमव्हीवर कोणतीही परिणामकारक रसायने नाहीत, किंवा रोपावरील संक्रमणाचा प्रतिबंध करुन रोपाचे संरक्षण करण्यासाठीही नाहीत. सायपरमेथ्रिन किंवा क्लोरपायरीफॉस असणार्‍या कीटनाशकांचे पानांवरील फवारे माव्यांसाठी मारले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

काकडी मोझाइक विषाणूंमुळे (सीव्हीएम) ही लक्षणे उद्भवतात, जी पुष्कळशा जातीच्या वाणांना, (पिकांना तसेच फुलांना खास करुन लिली, डेलफिनियम्स, प्रायम्युलाज आणि डॅफ्नेज ) प्रभावित करतात. व्हारसचे उचलणे आणे वहन सुमारे ६०-८० विविध प्रकारच्या माव्यांद्वारे होते. प्रसाराच्या इतर पद्धतीत येतात, संक्रमित बियाणे आणि कलमे, शेतकामगारांच्या उपकरणांद्वारे, हातांद्वारे. सीएमव्ही फुलांच्या बारमाही तणात आणि बहुतके वेळा पिकाच्या मुळात, बियाणांवर किंवा फुलांवरही विश्रांती घेतात. प्राथमिक संक्रमणात विषाणू पद्धतशीरपणे नविनच अंकुरलेल्या रोपात वाढतो आणि सगळ्यात वरच्या पानांपर्यंत पोचतो. ह्या रोपांना खाणारे मावे ह्या विषाणूंना इतर यजमानांपर्यंत वाहुन नेतात (दुय्यम संक्रमण). विषाणू यजमानाच्या रोपातील विविध भागांपर्यंत पोचण्यासाठी रोपाच्या वाहन प्रणालीचा उपयोग करतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुन विषाणूमुक्त बियाणे आणि रोपे घ्या.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • शेताचे निरीक्षण करुन रोगाची चिन्हे दर्शविणारे रोपे काढुन टाका.
  • कोणत्याही तणावर मोझाइक नक्षी दिसली तर ते काढुन टाका.
  • पिकाजवळ वाढणारे तण, पर्यायी यजमान काढुन टाका.
  • झाडीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे किंवा हत्यारे निर्जंतुक करण्याची काळजी घ्या.
  • पिक वाढीच्या सुरवातीच्या अठवड्यात स्थलांतरीत माव्यांना पळविण्यासाठी तरंगते आच्छादन लावा.
  • हा उच्च असुरक्षेचा काळ संपला कि आच्छादन काढा म्हणजे परागीकरण होईल.
  • अडथळा पिके लावा जी माव्यांना आकर्षित करतील.
  • चिकट सापळे वापरुन माव्यांना मोठ्या संख्येने पकडा.
  • जमिनीवर माव्यांना पळवुन लावणारे अल्युमिनियम फॉइलसारखे आच्छादन पसरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा