भात

भातावरील गवती खुज्या विषाणू रोग

RGSV

विषाणू

थोडक्यात

  • रोपाची वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणे आणि एक शिडी वाढ ही सामान्य लक्षणे आहेत.
  • गडद तपकिरी किंवा लालसर तपकिरी ठिपके पानांवर येतात.
  • रोपावस्थेत संक्रमित झालेले झाड क्वचितच पक्वतेपर्यंत पोचतात.
  • नंतरच्या टप्प्यावर संक्रमित झालेल्या झाडांना ओंब्या लागत नाहीत.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

भाताच्या पिकाला वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर लागण होते पण फुटवे येण्याच्या काळात ती जास्त संवेदनशील असतात. जास्त सर्वसामान्य लक्षणे गंभीर खुजेपणा, जास्त फुटव्यांमुळे तेलकट दिसणे आणि एक सीडी वाढ होणे हे आहेत. पान बारीक, अरुंद, फिकट हिरवी किंवा पिवळी असतात आणि त्यावर विखुरलेले ठिपके दिसतात. जवळुन पाहिल्यास अनेक बारीक गडद तपकिरी किंवा लालसर तपकिरी रंगाचे ठिपके किंवा धब्बे पानांच्या पृष्ठभागांवर दिसतात जे पूर्ण पानास ग्रासतात. नंतरच्या टप्प्यावर संक्रमित झालेली झाडे पक्व होतात पण बहुधा ओंब्या लागत नाहीत ज्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

विषाणूजन्य रोगांवर थेट उपचार शक्य नाहीत. निंबोळी बियाण्याचे अर्क वापरुन तपकिरी तुडतुड्यांची संख्या कमी करता येते आणि त्याद्वारे आरजीएसव्हीचा प्रसार रोखता येतो. तुडतुड्यांच्या नैसर्गिक भक्षकांत पाणकोळी, मिरिड बग्ज, कोळी आणि अंड्यांवर परिजीवीपणा करणारे वॅस्पस आणि माशा हे येतात. गादीवाफ्यात एक दिवसासाठी पाणी भरुन किड्यांना बुडवुन तपकिरी तुडतुड्यांची संख्या नियंत्रित करता येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूजन्य रोगांवर थेट उपचार शक्य नाहीत पण तुडतुड्यांची संख्या जास्त झाल्यास नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. अॅबेमेक्टिन, ब्युप्रोफेझिन आणि एटोफेनप्रोक्सवर आधारीत उत्पाद वापरले जाऊ शकतात. या कीटनाशकांच्या वापराने वाहक किड्यांच्या लोकसंख्येला नेहमीच खास करुन ज्या भागात वर्षभर फक्त भातच लावला जातो तिथे आळा घालता येत नाही.

कशामुळे झाले

तपकिरी तुडतुड्यांची प्रजाती नीलपर्वत (एन. लंजेन्स, एन. बाकेरी आणि एन. म्युइरि) या विषाणूंचे वहन करते. पिल्ले आणि प्रौढ दोघेही विषाणूंचे वहन खूप जास्त काळापर्यंत करु शकतात आणि म्हणुन सातत्याने आणि प्रसारक पद्धतीने नवनविन झाडांना लागण करत रहातात. तथापि विषाणू उचलण्यासाठी तुडतुड्यांनी किमान ३० मिनीटांसाठी संक्रमित झाडांवर उपद्रव केले पाहिजे. हा रोग मुख्यत: दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशिया, चीन, जपान आणि तैवान, इंडोनेशिया, फिलिपाइन्स आणि भारतात, खास करुन फक्त भात हे एकच पीक लावले जाते त्या ठिकाणे आढळतो. अनुकूल परिस्थितीत विषाणू, राइस रॅग्ड स्टंट व्हायरसबरोबर, ज्यांचे वहनही एन. ल्युजेन्स नावाचे वाहक किडे करतात, सहसंक्रमण करु शकतो आणि अत्यंत गंभीर नुकसान करवितो.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाच्या लक्षणांसाठी आणि/किंवा किड्यांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • झाडाच्या बुडापर्यंत ऊन पोचण्यासाठी लागवडीचे अंतर जास्त ठेवा.
  • आपल्या शेजार्यां च्या बरोबरच पेरणी करा म्हणजे किड्यांची उच्च लोकसंख्या टाळता येईल.
  • यांच्या हल्ल्याला प्रतिकारक वाण लावा.
  • खतांचा वापर विवेकाने करा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण काढुन नष्ट करा.
  • मित्र किड्यांना प्रभावित करतील अशी विस्तृत श्रेणीची कीटकनाशके वापरु नका.
  • काढणीनंतर पिकांचे अवशेष काढुन शेताबाहेर नेऊन नष्ट करा.
  • संक्रमित अवशेष नांगरुन खोल जमिनीत विघटनासाठी गाडा आणि किड्यांचे जीवनचक्र मोडा.
  • संवेदनशील नसलेल्या पिकांसह फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा