ढोबळी मिरची आणि मिरची

चुरडामुरडा

CLCV

विषाणू

थोडक्यात

  • पानांच्या कडा वरच्या दिशेने मुडपतात.
  • शिरा पिवळ्या पडतात.
  • पानांचा आकार कमी होतो.
  • जुनी पाने खरबडीत आणि जाड होतात.
  • झाडाची वाढ खुंटते.
  • फळांचे गुच्छ लहान आकाराची होतात.

मध्ये देखील मिळू शकते


ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

पानांच्या कडा वरच्या दिशेने मुडपणे, शिरा पिवळे पडणे आणि पानांचा आकार लहान होणे हे मिरचीवरील चुरडामुरडा रोगाचे विशिष्ट लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त,पानाच्या शिरा जाड होतात, पेरे आणि देठ लहान होतात. जुनी पाने खरबडीत आणि जाड होतात. जर झाडे हंगामाच्या सुरुवातीलाच संक्रमित झाल्यास त्यांची वाढ खुंटते ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. संवेदनशील वाणातील फळे अविकसित आणि विकृत होतात. विषाणूची लक्षणे फुलकिडे आणि कोळीच्या प्रदुर्भावाच्या नुकसानासारखीच असतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

विषाणूंचे वहन कमी करण्यासाठी पांढर्‍या माशीच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवा. नीम तेल किंवा बागायती (पेट्रोलियमवर आधारीत) तेलेही वापरली जाऊ शकतात. तेलाने पूर्ण झाड खास करुन पानांच्या खालच्या बाजु जिथे बहुधा पांढर्‍या माशा आढळतात, भिजल्याची खात्री करा. पांढर्‍या माशीची लोकसंख्या बहुधा, लेसविंग्ज, बिग आइड बग्ज आणि सूक्ष्म पायरेट बग्जसारखे नैसर्गिक शत्रु नियंत्रित करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. चुरडामुरडाचा प्रतिबंध करण्याची किंवा कमी करण्याची कोणतीही प्रभावी पद्धत माहितीत नाही. इमिडाक्लोप्रिड किंवा डायनोटेफ्युरान सारख्या रसायनिक नियंत्रण पद्धती वापरा. वाहकांचे नियंत्रण करण्यासाठी रोपांवर इमिडाक्लोप्रिड किंवा लँब्डा-सायहॅलोथ्रिनची फवारणी लागवडीपूर्वी करा. कीटनाशकांच्या अतिरेकी वापराने मित्र किडींना हानि होऊ शकते आणि पांढरी माशीच्या अनेक प्रजातींना प्रतिकार देखील निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी कीटकनाशकांना आलटुन पालटुन आणि फक्त निवडकच वापरा.

कशामुळे झाले

बेगोमोव्हायरस मुळे लक्षणे उद्भवतात ज्याचे वहन मुख्यतः पांढरी माशी सातत्याने करते. १.५ मि.मी. लांब, मेणचट पांढरे पंख आणि फिकट पिवळे शरीर हे त्यांचे वैशिष्ट्य असून ते शक्यतो पानांच्या खालच्या बाजुला आढळतात. रोगाचा प्रसार हा वार्‍याच्या परिस्थितीवर अवलंबुन असतो कारण यामुळेच ठरते कि पांढरी माशी किती दूरपर्यंत उडेल. हंगामाच्या मध्य ते उशीराच्या काळात पांढरी माशी जास्त समस्या निर्माण करते. हा रोग बियाणेजन्य नसल्याने, विषाणू शेतातच पर्यायी यजमानात (जसे कि तंबाखू आणि टोमॅटो) आणि तणात रहातो. अलीकडील पाऊस, संक्रमित रोप आणि तणांची उपस्थिती हे या रोगाच्या विकासास अनुकूल ठरतील असे काही अतिरिक्त घटक आहेत. रोपवाटिकेत मिरचीच्या रोपांना रापावस्थेत व वाढीच्या काळात संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असलेले प्रतिकारक वाण लावा आणि फक्त विषाणू मुक्त झाडांचीच बियाणे काढा.
  • मका, ज्वारी किंवा बाजरी सारख्या पिकांच्या किमान दोन ओळी अडथळा पीक म्हणुन शेताच्या चौबाजुने लावा.
  • पांढरी माशीच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवा आणि रोपवाटिकेत यांच्यापासुन संरक्षण करण्यासाठी कोवळ्या रोपांवर नायलॉनची जाळी पसरा.
  • शेताचे मुडपलेली पाने आणि खुंटलेली वाढ यासारख्या प्राथमिक लक्षणांना शोधण्यासाठी नियमित निरीक्षण करा.
  • पांढरी माशीला आकर्षित करण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे लावा.
  • रोपांना जाळीखाली वाढवुन वाहकांपासुन सौरक्षण करा ह्यामुळे पांढरी माशी देखील रोपांवर हल्ला करु शकणार नाही.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण नियंत्रण चोखपणे करा.
  • संक्रमित रोपे काढुन जाळुन नष्ट करा.
  • काढणीनंतर खोल नांगरुन किंवा जाळुन झाडांचे अवशेष नष्ट करा.
  • मिश्र पिके घेऊन मित्र किडींना प्रोत्साहन द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा