कापूस

कपाशीवरील पर्णगुच्छ रोग

Cotton Bunchy Top Virus

विषाणू

थोडक्यात

  • बारीक पाने, पेऱ्यातील कमी अंतर आणि बारीक बोंड.
  • पानाचे भाग खरबडीत आणि ठिसुळ असतात.
  • मुळे केसाळ आणि गडद तपकिरी होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

पानाचे देठ बहुधा लहान असतात आणि पानाच्या कडांवर फिकट हिरवी व टोकदार संरचना येते. निरोगी झाडावरील पानांपेक्षा ती खडबडीत आणि ठिसुळ दिसतात. नंतरच्या होणार्‍या वाढीत बारीक पाने, पेऱ्यातील कमी अंतर आणि बोंड देखील बारीक असतात. जर संक्रमण झाडाच्या वाढीच्या सुरवातीस (उदा. रोपावस्थेत), तर पूर्ण रोपाची वाढ खुंटलेली आणि दाट असते. मुळे केसाळ आणि गडद तपकिरी (बहुधा फिकट पिवळी ते तपकिरी रंगाची) असतात आणि दुय्यम मुळांवर गाठी येतात. प्रभावित झाडांना कमी प्रमाणात बोंड असतात परिणामी उत्पादन कमी येते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

शिकारी लेडीबग्ज, लष्करी भुंगे आणि परजीवी वॅस्पस सारखे मित्र किडे माव्याची लोकसंख्या नियंत्रित करण्यात महत्वाचे घटक आहेत. सौम्य संक्रमण झाले असता साधारण कीटकनाशक साबणाचे द्रावण किंवा रोपांच्या तेलांवर आधारीत द्रावणे वापरा. दमट हवामानात मावा बुरशीजन्य रोगांनाही संवेदनशील असतात. नुसत्या पाण्याने प्रभावित झाडांवर फवारणी केली असता देखील ते निघुन जातात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सायपरमेथ्रिन किंवा क्लोरपायरिफॉस असणार्‍याच कीटकनाशकांची फवारणी माव्या विरुद्ध केली जाऊ शकते. प्रतिकारशक्तीच्या विकासापासून दूर राहण्यासाठी वापरांमध्ये उत्पादने बदलण्याचे लक्षात ठेवा.

कशामुळे झाले

कपाशीवरील पर्णगुच्छ विषाणुंमुळे ही लक्षणे उद्भवतात जे फक्त जिवंत झाडाच्या भागातच जिवंत राहू शकतात. या विषाणूचे वहन अविरतपणे अॅफिस गॉसिफि नावाचे कपाशीवरील मावा करतात. संक्रमण झाल्यापासुन लक्षणे दिसेपर्यंत सुमारे ३-८ अठवडे जातात. ज्या शेतात माव्याची लोकसंख्या जास्त आहे तिथे जोखीम देखील उच्च असते. पूर्वीच्या हंगामात वाचलेली स्वयंभू रोपे, पुनर्वाढ किंवा फरतड हे एक समस्या असू शकतात कारण ते माव्यासाठी पसंतीचे यजमान असतात आणि रोगाचे एक भांडार म्हणून काम करतात, ज्यातुन नविन मोसमात संक्रमणासाठी स्त्रोत मिळतो. अशा प्रकारे फरतड भोवती संक्रमित झाडांनी भरलेले भाग पहाणे अशक्य नाही. माव्याचा प्रजनन, आहार आणि प्रसार यासाठी योग्य हवामान लाभल्यास प्रादुर्भावाचा प्रसार जलदगतीने होतो.


प्रतिबंधक उपाय

  • पिकाचे अवशेष पूर्णपणे नष्ट करा आणि फरतड तसेच इतर स्वयंभू झाडे शेतातुन काढुन टाका.
  • शेतात आणि आजुबाजुने कपाशीच्या स्वयंभू झाडांचे नियंत्रण करा.
  • माव्याच्या विरोधात उत्पादनांचा जास्त वापर करणे टाळा, कारण हे प्रतिकारशक्तीच्या विकासाला अनुकूल करेल.
  • माव्यासाठी कोवळ्या रोपांची व्यवस्थित निरीक्षण करुन शेतातील माव्याच्या संख्येचे अनुमान बांधा.
  • चिकट पट्ट्या वापरून माव्याला संरक्षण करणाऱ्या मुंग्यांचे नियंत्रण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा