WMV
विषाणू
पीक, संक्रमणाची वेळ आणि हवामान परिस्थिती याप्रमाणे लक्षणे बदलतात. तसेच संक्रमण जर मिश्रित म्हणजे काकडीवरील मोझाईक व्हायरस आणि झुकिनीवरील पिवळा मोझाईक व्हायरस सारख्या इतर विषाणुंबरोबर संक्रमण झाले असेल तर लक्षणे दबु किंवा बदलु शकतात. एकुणच पानांवर ठिगळासारखे किंवा विखुरलेले उंचवटलेले ठिपके, मस्से येतात आणि विविध पातळीने पाने विकृत होतात. फळांवरील रंग समान नसतो हे आणखी एक लक्षण आहे. खरबुजावर गडद हिरवे डाग किंवा फळांच्या एरवी पिवळसर असलेल्या पृष्ठभागावर धब्बे येतात. वाटाण्याच्या पानावरील उंचवटलेले ठिपके कालांतराने करपट डागात रूपांतरित होतात. पानांना नुकसान झाल्याने, या विषाणूच्या संक्रमणाबरोबर वाढीचा दर आणि उत्पादन देखील कमी होते.
खनिज तेलांची फवारणी विषाणुंच्या वहनात बाधा आणतात आणि परिणामकारक नियंत्रण होऊ शकते. माव्याचे भक्षक भरपूर आहेत आणि त्यांना शेतीच्या चांगल्या सवयींद्वारे जोपासले पाहिजे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जरी विषाणुंचे थेट उपचार कीटकनाशकाद्वारे होत नसले तरी वाहकांचे मुख्यत: माव्यांचे नियंत्रण काही पातळीपर्यंत केले जाऊ शकते. तरीपण काही परिस्थितीत माव्यांवरील कीटकनाशकाचे उपचार सीमित परिणाम देतात. मावा आणि त्यांच्या संभाव्य रसायनिक नियंत्रणासाठी डेटाबेस तपासा.
कलिंगडावरील मोझाईक विषाणुंमुळे ही विविध लक्षणे उद्भवतात. या विषाणूचे, वाहक (मुख्यत: मावा) किंवा व्यक्ति किंवा हत्यारे अशा विविध प्रकारांनी वहन होते पण हे बियाणेजन्य नसल्याने बियाणांद्वारे होत नाही. मावा त्यांना रस शोषताना उचलतात आणि संपर्कानंतर काही तासात अविरतपणे प्रसार करतात. मुख्य पर्यायी यजमान काकडीवर्गीयांव्यतिरिक्त वाटाणा आणि अल्फाल्फा आहेत. प्रसार अविरतपणे होत असल्यामुळे कीटकनाशके विषाणुंविरुद्ध चांगला परिणाम देत नाहीत पण त्यांचा वापर माव्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणुन केला जाऊ शकतो. शेतात जर विषाणू असतील तर मावा त्यांचा प्रसार नविन यजमानांवर जोपर्यंत कीटकनाशकांमुळे माव्यांचा नाश होत नाही तोपर्यंत सतत करत रहातात.