TSV
विषाणू
सुरवातीला संक्रमित झाडांच्या पानांवर छोटे अनियमित पिवळे भाग किंवा रंगहीनता दिसुन येते, जी २-५ मि.मी व्यासाची असते. काही काळानंतर, ते मोठ्या कोनेदार पिवळे किंवा करपट चट्ट्यांमध्ये (पिवळे किंवा तपकिरी) बदलतात आणि ५-१५ मि.मी. व्यासाचे होतात ज्यामुळे ठिगळासारख्या संरचना पानांवर दिसतात. पाने करपून अकाली गळु शकतात. झाडाचा बांधा कमी होतो आणि रोपाची वाढ खुंटते. फुले फार कमी येतात आणि बोंडे अकाली गऴु शकतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. संक्रमित पानांच्या शिरा पिवळ्या, जाड आणि विकृत होतात. लक्षणे जास्त करुन नविन पानांवर दिसतात जी निरोगी पानांपेक्षा फिकट दिसतात, आणि बहुधा त्यांच्या शेंड्यांची वाढ देखील खुंटते. प्रभावित क्षेत्र सामान्यतः फिकटच दिसते.
तंबाखूच्या स्ट्रीक व्हायरस विरुद्ध कोणतेही थेट जैविक उपचार उपलब्ध नाहीत. तरीपण मावा आणि फुलकीडे सारख्या वाहकांच्या नियंत्रणासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या विषाणूजन्य रोगावर थेट उपचार शक्य नाहीत पण फुलकीडे, मावा आणि इतर रसशोषक किडींचे नियंत्रण काही पातळीपर्यंत शक्य आहे. अधिक माहितीसाठी फुलकीडे आणि मावाविरुद्धचे रसायनिक उपचार वाचा उदा. फिप्रोनिल (२ मि.ली/ली) किंवा थियामेथॉक्झाम (०.२ग्रॅ/ली).
ही लक्षणे विषाणूमुळे दिसतात ज्याची यजमान पीक बरीच आहेत जसे तंबाखु (म्हणुन ते सामान्य नाव), शतावरी, स्ट्रॉबेरी, सोयाबीन, सुर्यफुले. विषाणू बियाण्यातुनही येत असल्याकारणाने, रोगाचा प्रसार करण्यासाठी संक्रमित बियाणेही प्राथमिक स्त्रोत आहेत. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावरील दुय्यम संक्रमण हे वाहक किड्यांद्वारे (मावा किंवा फुलकीडे) किंवा शेतातील काम करताना रोपाला झालेल्या इजेतुन होते. पीकांवरील परिणाम आणि लक्षणे हे लागवड केलेले वाण, हवामान (तापमान आणि आर्द्रता) आणि वाढीच्या कोणत्या काळात लागण झाली ह्यावर अवलंबुन आहे. बियाणातील संसर्गाच्या तुलनेने माव्याद्वारे उशिरा झालेले संक्रमण सहसा तेवढे गंभीर नसते.