मका

मक्यावरील पिवळे ठिपके देणारे विषाणू

MCMV

विषाणू

थोडक्यात

  • पानावर अनेक पिवळे ठिपके आणि पट्टे दिसतात.
  • नंतरच्या टप्प्यावर, पिवळे पट्टे किंवा धब्बे पूर्ण पान ग्रासतात.
  • कणस विकृत होतात, पेर लहान होतात आणि झाडाची वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

विविध संकरीत/सरळ वाण आणि कोणत्या टप्प्यावर झाडाला संक्रमण झाले याप्रमाणे लक्षणे बदलतात. पानांच्या शिरांना समांतर जाणारे पट्टे आणि अनेक बारीक पिवळे ठिपके असणे हे रोगाचे वैशिष्ट्य आहे. जसे ते वाढतात तसे एकमेकात मिसळतात आणि पिवळ्या भागांचे लांब पट्टे, रेषा किंवा धब्बे तयार होतात व अखेरीस पानाची मर होते. झाड खुजी दिसतात व पेरे लहान पडतात. तुरे विकृत असतात, तुऱ्याचा दांडा कणा लहान असतो व ओंब्या कमी प्रमाणात लागतात. खासकरून संवेदनशील झाडात किंवा लवकर लागण झाल्यास, कणीस व्यवस्थितरित्या विकसित होत नाहीत आणि प्रत्येक झाडाला खूप कमी संख्येने लागतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

विषाणूजन्य रोगांचे थेट नियंत्रण करता येत नाही. विषाणूंच्या घटना प्रतिबंधीत करण्यासाठी प्रतिकारक वाण लावणे हाच उत्कृष्ट उपाय आहे. बीटल्स, फुलकिडे किंवा कोळी यासारख्या विषाणूंचे वहन करणार्‍या वाहक किड्यांच्या जैविक नियंत्रणासाठी डेटाबेस तपासा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रसायनिक उत्पादचा थेट वापर करुन विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण केले जाऊ शकत नाही. तथापि, विषाणूंचे वहन करणार्‍या वाहक किड्यांचे व्यवस्थापन कीटकनाशके वापरुन केले जाऊ शकते.

कशामुळे झाले

(एमसीएमव्ही) विषाणूमुळे लक्षणे उद्भवतात ज्याचा प्रसार अनेक प्रकारचे किडे जसे कि तुडतुडे, बीटल्स आणि बहुधा काही प्रकारचे कोळी (टेट्रानयचस प्रजाती) आणि फुलकिडे (फ्रँक्लिनिएला प्रजाती) करतात. एमसीएमव्हीचा प्रसार मका लागवडीच्या नविन भागात संक्रमित लागवडीच्या सामग्री मुळे होतो. एकदा का लागण झाली कि याचा प्रसार सातत्याने मक्याच्या निरोगी झाडांवर वर सांगीतलेल्या किड्यांच्या प्रादुर्भावामुळे होतो. जेव्हा मक्याची झाड उपलब्ध नसतात तेव्हा अळ्यांच्या टप्प्यात ते विश्रांतीही घेऊ शकतात. याला बियाणेजन्य मानले जात नाही तथापि रोपांना इजा झाल्यास त्यातुन संक्रमण होऊ शकते. जास्त तापमान, तणावपूर्ण परिस्थिती आणि ओल्या हवामानाचा मोठ्या कालावधीचा काळ या रोगाच्या विकासाला अनुकूल असतो.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा कारण या रोगाविरुद्ध हीच महत्वाची पायरी आहे.
  • शेताचे नियमित निरीक्षण करुन संक्रमित झाडे काढुन टाका.
  • शेतात काम करताना मक्याच्या झाडाला इजा होऊ देऊ नका.
  • पर्यायी तण यजमान खास करुन गवती तण नियंत्रित ठेवा.
  • काढणीनंतर पिकाचे अवशेष जमिनीत मिसळण्यासाठी खोल नांगरणी करा.
  • एका वर्षासाठी संवेदनशील नसणार्‍या पिकासह फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा