CMD
विषाणू
पर्णविकसनाच्या सुरवातीच्या काळातच पानांवर विशिष्ट मोझाइक संरचना किंवा विखुरलेले ठिपके येतात. क्लोरोसिस हा फिकट पिवळा किंवा जवळपास पांढरट भाग म्हणुन इतर हिरव्या भागतुन दिसुन येतो. मोझाइक संरचना हे सामान्यपणे पूर्ण पानावर पसरलेला असतो किंवा काही भागातच केंद्रीत असतो, जे भाग बहुधा पानाच्या देठापाशी असतात. गंभीर संक्रमणात पाने विकृत आकाराची, वेडीवाकडी, आणि आकाराने कमी भरतात. काही पाने सामान्य दिसतात किंवा सावरल्यासारखी दिसतात पण हे त्यावेळचे हवामान आणि झाडाच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबुन असते. तरीही, विषाणूंसाठी अनुकूल हवामान परिस्थितीत लक्षणे परत येतात. पानांची उत्पादकता कमी झाल्याने झाडाच्या एकुणच वाढीवर आणि कंद तयार होण्यावर प्रभाव पडतो. कंदांचे आकारमान हे संक्रमणाच्या गंभीरतेशी थेट निगडित आहे, गंभीर संक्रमित झाडांना कंद धरतच नाहीत.
या विषाणूंचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैविक नियंत्रण उपाय उपलब्ध नाहीत. तरीही, पांढर्या माशीचे शत्रु तसेच भक्षक खूप आहेत ज्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. संभवित जैविक नियंत्रणात इसारिया (ज्यास पूर्वी पेसिलोमायसेस म्हटले जायचे) सह इसारिया फारिनोसा आणि इसारिया फ्युमोसोरोसे या दोन प्रजातींचा वापर येतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पांढरीमाशीची लोकसंख्या प्रभावी नियंत्रण करण्यात जगभरात मानल्या गेलेल्या सक्रिय घटकात येतात बायफेन्थ्रिन, ब्युप्रोफेन्झिन, फेनॉक्सिकार्ब, डेल्टामेथ्रिन, अॅझिडिरॅक्टिन आणि पायमेट्रोझिन. तरीही या उत्पादांचा वापर सद्सद्विवेक बुद्धीने करावा कारण अतिरेकी वापर केल्यास या किडींमध्ये त्याचा प्रतिकार निर्माण होतो.
अरारुट मोझाइक रोगाची लक्षणे विषाणूंच्या गटामुळे होतात जे बहुधा अरारुटच्या झाडाला एकत्रितपणे संक्रमित करतात. या विषाणुंचे वहन बेमिशिया टॅबासी नावाच्या पांढरी माशीद्वारे सातत्याने केले जाते तसेच संक्रमित झाडांच्या कलमाद्वारेही होते. पांढरी माशीचे वहन वाहणार्या वार्याद्वारे होते आणि त्या विषाणुंचे वहन काही किलोमीटरपर्यंत करु शकतात. अरारुटची वाणे या विषाणूंच्या संवेदनशीलतेत खूप विभिन्न असतात पण सामान्यपणे लक्षणे पहिल्यांदा कोवळ्या पानांवरच दिसतात, कारण पांढर्या माशीला कोवळी, मऊ पाने रस शोषण करण्यास आवडतात. विषांणूंचा प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणावर या किडींच्या लोकसंख्येवर अवलंबुन आहे जे पर्यायाने त्यावेळच्या हवामान परिस्थितीवर अवलंबुन असतात. जर पांढरी माशीची मोठी लोकसंख्या आणि अरारुटची इष्टतम वाढ यांची वेळ जुळुन आली तर विषाणूंचा प्रसार खूप झपाट्याने होतो. या उपद्रवास २० ते ३२ अंश तापमान फार अनुकूल असते.