इतर

घेवड्यावरील पिवळा मोझाईक व्हायरस

BYMV

विषाणू

थोडक्यात

  • शेंडे रंगहीन होतात, मोझाइकची उपस्थिती आणि क्लोरोसिसचे पिवळे धब्बे विकसित होतात.
  • शेंगा चांगल्या विकसित होत नाहीत.
  • वाढ खुंटलेली असते.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके

इतर

लक्षणे

विषाणूंचा प्रकार, पीक आणि त्याच्या वाणाचा प्रकार, संक्रमणाच्या वेळी वाढीचा टप्पा आणि हवामान याप्रमाणे लक्षणे बदलतात. पानांवर, टोके रंगहीन होणे, छटा येणे आणि पिवळे कोरडे धब्बे विकसित होणे अशी लक्षणे दिसतात. सगळ्यात उठुन दिसणारे लक्षण म्हणजे झाडीत उठुन दिसणारे पानांचे हिरवे आणि पिवळे विरोधाभास. काही वेळा गडद हिरवे भाग पिवळ्या क्लोरोटिक भागापेक्षा थोडे उंचावतात. काही पिकात शिराच नाहीशा होतात. त्यामुळे पाने वेडीवाकडी वाढुन विकृत होतात आणि कडा खालच्या बाजुला मुडपतात. जरी शेंगा थेटपणे प्रभावित होत नसल्या तरी त्या कमी विकसित किंवा विकृत असतात आणि दाणेही कमी भरतात. एकुणच रोपाची वाढ खुंटलेली असते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

घेवडा पिकावरील मोझाइक विषाणूचे वहन थांबविण्यासाठी माव्यांच्या लोकसंख्येचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. पानांच्या खालच्या बाजु माव्यांसाठी तपासा. सापडल्यास लगेच कीटनाशक साबण, नीम तेल किंवा पायरेथ्रॉइडवर आधारीत सेंद्रिय उत्पादांचा वापर करा. माव्यांना खाणार्‍या शिकार्‍यांचाही उपयोग केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूंविरुद्ध कोणतेही उपचार नाहीत आणि माव्यांचे पूर्ण नियंत्रण फार कठिण आहे. खर तर विषाणूंचा प्रसार प्रतिबंध करण्याइतपत झपाट्याने मावे मारले जात नाहीत. खनिज तेल (१%), एकटे वापरले किंवा कीटकनाशकांबरोबर वापरले तर विषाणूंचा प्रसार खूपच कमी होतो. तरीपण ते फार महाग असतात आणि नविन वाढणार्‍या कोंबांना सुरक्षित ठेवण्यासाठी वारंवार उपचार करावे लागतात. रोपाचे उत्पन्नही कमी होते.

कशामुळे झाले

पिकावरील पिवळ्या मोझाइक विषाणूमुळे (बीवायएमव्ही) लक्षणे उद्भवतात. बहुधा संक्रमण हे इतर विषाणूंबरोबर होते, ह्यावरुन विविध प्रकारची लक्षणे का होतात ते कळते. काकडीवरील मोझाइक विषाणू (सीएमव्ही) हा सगळ्यात जास्त सह-संक्रमण करणारा एजंट आहे. बीन्सबरोबरच तो इतर महत्वाच्या शेंगवर्गीय पिकांनाही संक्रमित करतो, जसे कि भुईमुग,सोयाबीन, ब्रॉडबीन्स, शेंगवर्गीन नसणार्‍या क्लोव्हर, अल्फाल्फा आणि ल्युपिनच्या पुष्कळशा प्रजाती सुप्तावस्थेत जाण्यासाठीचे यजमान म्हणुन काम करतात. इतर शेंगवर्गीय नसलेल्या यजमान रोपात येतात, काही फुले जसे कि, ग्लॅडियोलस. ह्या सगळ्या रोपात विषाणू सुप्तावस्था घालवितो. विषाणूचे वहन एका रोपावरुन दुसर्‍या रोपावर वाहकाद्वारे होते, तरी तो बियाणांतही राहू शकतो अशी शंका आहे. माव्यांच्या सुमारे वीसपेक्षा जास्त प्रजाती ह्याचे वहन अविरतपणे करतात ज्यात अॅसिर्थोसिफॉन पायसम, मॅक्रोसिफम युफोरबिये, मायझस परसिके, अॅफिस फाबे येतात. ह्याचा प्रसार कलमात दूषित रोपांचे भाग वापरल्याने किंवा उपकरणांद्वारेही होतो.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी बियाणे किंवा प्रमाणित स्त्रोताकडुन रोपे घ्या.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण घ्या.
  • झाडी जास्त दाट करण्यासाठी दाट लागवड करा.
  • अल्फाल्फा, क्लोव्हर किंवा इतर शेंगवर्गीय किंवा ग्लॅडियोलससारख्या फुलांच्या आजुबाजुला बीन्सची लागवड करु नका.
  • शेताच्या कडेचे धान्य पट्ट्यांना अडथळा पीक म्हणुन वापरा.
  • प्लास्टिक किंवा पालापाचोळा जमिनीवर अंथरा ज्यामुळे माव्यांचे जीवनचक्र बाधीत होईल.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण काढुन टाका.
  • मित्र किड्यांना बढावा देण्यासाठी कीटनाशकांचा वापर कमी ठेवा.
  • जर शेतात ह्या उपद्रवाचा इतिहास असेल तर नक्की पीक फेरपालट योजना करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा