केळी

केळीवरील काकडी वर्गीय विषाणू

CMV

विषाणू

थोडक्यात

  • पिवळ्या आणि हिरव्या ठिगळ नक्क्षीमुळे पानांवर पट्ट्यापट्ट्या आल्यासारखे दिसतात.
  • विकसित होणारी पाने विकृत असतात आणि पानांच्या कडांवर काळे करपट भाग तयार होतात.
  • पर्णकोष आणि फांद्यांच्या आतल्या भागात कुजलेले भाग दिसु शकतात.
  • संक्रमित झाड परिपक्व होत नाहीत किंवा घड तयार करु शकत नाहीत.
  • फळे आकाराने लहान असुन त्यावर देखील पिवळ्या रेषा किंवा करपटपणा दिसु शकतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

झाडाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर संक्रमण होऊ शकते आणि मुख्यत: पानांवर दिसते. सुरुवातीच्या लक्षणात सलग किंवा तुटक पट्ट्यांची ठिगळासारखी संरचना शीरांना समांतर येते. पाने पट्टेदार दिसु लागतात. कालांतराने झाडी पूर्णत: विकसित होत नाही आणि पानांच्या कडा अनियमितपणे गोळा होऊन करपट ठिपके दिसु शकतात. कोवळी पाने देखील आकाराने लहान असतात. पर्णकोषांवर कुजलेले भाग दिसु शकतात आणि फांद्यावर तसेच कंदांवर देखील पसरु शकतात. जुन्या पानांवर करपटपणाची लक्षणे काळ्या किंवा जांभळ्या रेषातुन दिसु शकते आणि ती गळु शकतात. संक्रमित झाड परिपक्व होत नाहीत आणि घड तयार करु शकत नाहीत. फळे नेहमी लक्षणे दाखवत नाहीत परंतु आकाराने लहान दिसतात आणि त्यावर पिवळ्या रेषा किंवा करपटपणा दिसु शकतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

विषाणुजन्य रोगांवर थेट उपचार शक्य नाहीत पण माव्यांची संख्या कमी करुन त्यांच्या द्वारे होणार्‍या संक्रमणाची जोखिम कमी करता येते. परजीवी किंवा भक्षक किडे आणि बुरशीच्या काही प्रजातींसारख्या विविध नैसर्गिक शत्रुंचा वापर परिणामकारकरीत्या माव्यांविरुद्ध केला जाऊ शकतो. ४० डिग्री सेल्शियसच्या कोरड्या उष्णतेचे उपचार मुनव्यांवर एका दिवसासाठी केले असता देखील संक्रमणाचा धोका कमी होण्यात मदत होऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणुजन्य रोगांवर थेट उपचार शक्य नाहीत पण पर्यायी यजमान आणि वाहक किड्यांचे नियंत्रण काही प्रमाणात करता येते. जर कीटनाशकांची गरज भासलीच तर डेमेन्टॉन मिथाइल, डायमेथोएट आणि मॅलेथियॉन असणारे उत्पाद फवारणीसाठी वापरावेत. कृपया लक्षात ठेवा कि वर नमूद केलेले कीटकनाशक विषारी असुन ती मानवी तसेच प्राण्यांच्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम करु शकतात.

कशामुळे झाले

विषाणूमुळे लक्षणे उद्भवतात. प्राथमिक संक्रमण बहुधा संक्रमित मुनव्यांद्वारे होते. माव्याच्या प्रजाती वाहक म्हणुन काम करतात आणि विषाणूंना बागेतील एका झाडावरून दुसऱ्या झाडावर घेऊन जातात ज्यामुळे दु्य्यम संक्रमण होते. काकडी आणि टोमॅटो हे विषाणूंचे सुप्त यजमान आहेत म्हणजे विषाणू या झाडांमध्ये कोणतीही लक्षणे न दर्शविता रहातात. पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शेवटी वारंवार पाऊस यासारखी ठराविक हवामान परिस्थिती संक्रमणास अनुकूल असतात. हा रोग केळीसाठी गंभीर धोका आहे आणि यामुळे उत्पादनाचे प्रचंड नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • कठोर क्वारंटाइन नियम जर असतील तर त्यांचे पालन करा.
  • खात्रीदायक स्त्रोताकडुन सुदृढ कंद किंवा मुनवे घ्या.
  • संवेदनशील वाणांची लागवड टाळा.
  • नियमितपणे बाग किंवा झाडांचे रोगाच्या लक्षणांसाठी आणि माव्यासारख्या किड्यांच्या उपस्थितीसाठी निरीक्षण करत चला.
  • टोमॅटो, काकडी, मका, आणि पॅनिकम आणि डिजिटॅलिया कुटुंबातील प्रजाती सारख्या पर्यायी यजमानांची लागवड केळीच्या सानिध्यात करु नका.
  • ब्राऊन हेम (क्रोटॅलॅरिया जनसी) सारख्या अडथळा पीकांच्या तीन ते चार ओळी लावुन माव्याला संक्रमित शेतातुन येण्यापासुन अडथळा निर्माण केला जाऊ शकतो.
  • बागेतील संक्रमित झाडांना काढुन खोल पुरून किंवा जाळुन नष्ट करा.
  • मुनव्यांचे वहन वेगवेगळ्या क्षेत्रात करू नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा