गहू

गव्हावरील खुज्या विषाणू रोग

WDV

विषाणू

थोडक्यात

  • झाडाची वाढ खुंटते व ती झुडपासारखी दिसतात आणि कांडे पण कमी येतात.
  • पानांवर शिरांना समांतर पिवळ्या रेषा दिसतात ज्या कालांतराने पूर्ण पानास ग्रासतात.
  • ओंब्या कमी प्रमाणात येतात व आलेल्या ओंब्यात बारीक किंवा पोकळ (वांझ) दाणे येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

गहू

लक्षणे

गव्हाला खुजा करणार्‍या विषाणूच्या संक्रमणामुळे गंभीर लक्षणे जसे कि झाडाची वाढ खुंटणे, झाडे झुडपासारखी दिसणे आणि पान तसेच कांडे कमी येणे दिसुन येतात. पानांवर पिवळेपणाच्या रेषा येतात ज्या कालांतराने पूर्ण पान ग्रासतात. ओंब्या कमी येतात आणि येणार्‍या ओंब्यातील दाणे पोकळ (वांझ) किंवा बारीक असतात. विषाणूचे वहन सॅमोटेटिक्स एलियनस नावाचे वाहक तुडतुडे करतात, जे पोषके वाहणार्‍या रसांचे शोषण गव्हाच्या वनस्पती भागातुन सोंडेने करतात ज्यातुन विषाणू संक्रमित होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या विषाणूंविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर वाहक किड्यांची संख्या खूपच जास्त असली तरच कीटनाशकांचा उपयोग करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. इमिडाक्लोप्रिडने बीजप्रक्रिया केल्यास वाहकांचे प्रभावी नियंत्रण केले जाऊ शकते. गव्हाच्या रोपांना पायरेथ्रॉइड किंवा इतर कीटनाशकांचे उपचार करुन विषाणूंचे वहन टाळले जाऊ शकते.

कशामुळे झाले

सॅमोटेटिक्स एलियनस नावाच्या तुडतुड्याद्वारे विषाणूंचे अविरत वहन होते ज्यामुळे लक्षणे उद्भवतात. तरीपण, विषाणूमुक्त तुडतुड्यांनी रस शोषल्यामुळे रोग संक्रमण होत नाही. तुडतुड्याने विषाणूचे संक्रमण करण्यासाठी बऱ्याच मिनीटांपर्यंत शोषण करीत राहीले पाहिजे. सॅमोटेटिक्स एलियनसच्या २-३ पिढ्या प्रतिवर्षी निर्माण होतात, रब्बीच्या गव्हाला शरद ऋतुत आणि खरीपाच्या पीकाला वसंत ऋतुत संक्रमण करतात. तुडतुडे अंड्याच्या रुपात विश्रांती घेतात आणि मे महिन्यात किड्यांच्या पिल्लांची पहिली पिढी बाहेर येते. विषाणूचे वहन अंड्याद्वारे किंवा किड्यांच्या पिल्लांद्वारे होत नाही. गव्हाला खुजे करणारे विषाणू जव, ओट आणि राय सारख्या बऱ्याच तृणधान्यांना संक्रमित करतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • शेतात पान, फांद्या आणि कोंबांवर दररोज किड्यांसाठी निरीक्षण करा.
  • तुडतुडे वाढु नयेत म्हणुन झाडांचे प्रादुर्भावग्रस्त भाग वेचुन नष्ट करा.
  • शेतात स्वच्छता ठेवा, तण आणि पर्यायी यजमान रोप काढुन टाका.
  • पीक घेतल्यानंतर झाडांचे अवशेष काढुन टाका.
  • किड्यांची उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • संक्रमित शेतात झाडांचा जोम परत येण्यासाठी नेहमीपेक्षा लवकर खते द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा