टोमॅटो

टोमॅटोवरील बोकड्या (घुबडा) किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग

TYLCV

विषाणू

थोडक्यात

  • पाने जाड आणि सुरकुतलेली असतात आणि पानाच्या दोन शिरांमधल्या भागात पिवळेपण स्पष्ट दिसतो.
  • ह्या पिवळ्या पडलेल्या पानांच्या कडा वरच्या आणि आतल्या बाजुने गोळा होतात.
  • फळे कमी येतात पण फळांवर नजरेत भरण्यासारखी लक्षणे पृष्ठभागावर दिसत नाहीत.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

टोमॅटो

लक्षणे

रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास कोवळी पाने व कोंबांची वाढ खुंटून झाडे झुडपासारखे दिसु लागतात. जुन्या झाडात झालेल्या संक्रमणामुळे फांद्या जास्त येतात, पाने जाड आणि सुरकुतलेली होतात आणि पानाच्या दोन शिरांमधल्या भागात पिवळेपण स्पष्ट दिसतो. रोग जसा वाढेल तशी पाने खरबडीत होतात आणि त्यांच्या पिवळ्या कडा वरच्या आणि आतल्या बाजुने गोळा होतात. जर फुलधारणेच्या आधी संक्रमण झाले तर कोणतेही स्पष्ट बाह्य लक्षण दिसत नसतानाही फळांची संख्या खूपच कमी होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

टोमॅटोवरील बोकड्या किंवा पर्णगुच्छ रोगाविरुद्ध (टीवायएलसीव्ही) कोणतेही उपचार नाहीत. विषाणूंचे संक्रमण टाळण्यासाठी पांढर्‍या माशांची लोकसंख्या नियंत्रित करावी.

रासायनिक नियंत्रण

एकदा विषाणूचे संक्रमण झाले कि ह्याविरुद्ध काहीही उपचार उपलब्ध नाहीत. विषाणूंचे संक्रमण टाळण्यासाठी पांढर्‍या माशांची लोकसंख्या नियंत्रित करावी. पायरेथ्रॉइडस कुटुंबातील कीटकनाशके रोपावस्थेत आळवणी किंवा फवारणी द्वारे वापरल्याने पांढर्‍या माशांची लोकसंख्या कमी होते. तरीपण ह्याच्या जास्त वापराने पांढरी माशी ह्या कीटकनाशकाविरुद्ध प्रतिकार निर्माण होऊ शकतो.

कशामुळे झाले

टोमॅटोवरील बोकड्या किंवा पर्णगुच्छ रोग हा बीजजन्य रोग नसुन ह्याचे वहन बाह्य रूपाने होत नाही. बेमिशिया टेबॅसी या प्रजातीच्या पांढरी माशीद्वारे ह्या रोगाचा प्रसार होतो. ही पांढरी माशी पानाच्या खालच्या बाजूला रस शोषण करते व नविन कोवळ्या रोपांवर आकर्षित होते. रोगाच्या संसर्गाचे पूर्ण चक्र सुमारे २४ तासांचे असते आणि कोरड्या हवेबरोबर उच्च तापमान ह्यांना अनुकूल असते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • पांढरी माशीची उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी लवकर लागवड करा.
  • कोहळा किंवा काकडी सारख्या यजमान नसलेल्या पिकांसोबत आंतरपीक लावा.
  • पांढरी माशी टाळण्यासाठी रोपवाटीकेतील गादी वाफ्यांवर जाळी पसरा.
  • आपल्या पिकांच्या जवळ पर्यायी यजमान असलेल्या झाडांची लागवड टाळा.
  • रोपवाटिका आणि शेतात प्लास्टिक अच्छादन करा ज्यामुळे पांढरी माशीचे जीवनचक्र खंडित होईल.
  • पांढरी माशीला मोठ्या संख्येने पकडण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावा.
  • शेताचे निरीक्षण करुन संक्रमित झाडे उपटून खोल पुरा.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण नियंत्रण काटेकोरपणे करा.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरणी करून झाडांचे सर्व अवशेष काढुन जाळुन टाका.
  • पांढरी माशीला संवेदनशील नसणार्‍या पिकांसोबत पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा