टोमॅटो

टोमॅटोवरील ठिपकेदार मरगळ आणणारा विषाणू

TSWV

विषाणू

थोडक्यात

  • पानांवर गडद तपकिरी ठिपके विकसित होतात व कालांतराने मोठे होऊन करपट भागात बदलतात.
  • वाढ खुंटते.
  • हिरव्या फळांवर हिरवी वर्तुळे दिसतात.
  • पिकलेल्या फळांवर तपकिरी वर्तुळे आणि डाग दिसतात.
  • फळे क्वचितच विकृत आकाराचीही होतात.

मध्ये देखील मिळू शकते


टोमॅटो

लक्षणे

कोवळ्या पानांवर तपकिरी किंवा जांभळे डाग येऊन पान करपणे ही सुरवातीची लक्षणे आहेत. हे बहुधा झाडाच्या शेंड्याकडे होते. कोवळ्या पानांवर जांभळ्या छटा आणि बारीक, गडद तपकिरी डाग उमटतात ज्याची काही वेळेस केंद्रीत वर्तुळे तयार होतात. रोपे संक्रमित झालेल्या काळ आणि पर्यावरणाप्रमाणे, पान, देठ, फांद्या आणि फळांवरील लक्षणात फरक पडू शकते. रोगाचा प्रसार वरुन खाली होतो. ते एकमेकांत मिसळून पानाचा मोठा भाग व्यापतात व अखेरीस ते भाग करपतात. फांदी आणि देठांवर गडद तपकिरी रेषा उमटतात. शेंडे बहुधा करपतात. झाडाची वाढ खुंटते किंवा एकाच बाजुने वाढ दिसते. गंभीर संक्रमण झालेल्या झाडावरील हिरव्या फळांवर गोलाकार फिकट हिरवे उंचवटलेले भाग दिसतात. पिकलेल्या फळांवर तपकिरी वर्तुळे आणि पिवळे डाग दिसतात ज्यामुळे ती विक्रीलायक उरत नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

काही भक्षक किडी फुलकिड्याच्या अळ्या किंवा कोषांना खातात आणि बाजारात उपलब्ध आहेत. ज्या प्रजाती फुलांवर काहीही न करता फक्त पानांवर हल्ला करतात, त्यांच्यासाठी निंबोळी तेल किंवा स्पिनोसॅड, खासकरुन पानांच्या खालच्या बाजुने वापरा. स्पिनोसॅडचा वापर फार परिणामकारक असतो पण तो काही नैसर्गिक शत्रुंसाठी (उदा. भक्षक किडे, सिरफिड माशांच्या अळ्या, मधमाशा) विषारी असतो आणि म्हणुन फुले येण्याच्या काळात याचा वापर करु नये. जर फुलांवर फुल किड्यांचे संक्रमण होत असेल तर काही भक्षक किडे किंवा हिरव्या लेसविंग्जच्या अळ्यांचा वापर केला जाऊ शकतो. लसुण अर्काबरोबर काही कीटनाशकांचा वापर देखील काम करतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उच्च प्रजनन दर आणि त्यांचे जीवनचक्र यामुळे फुलकिड्यांनी विविध श्रेणीच्या कीटनाशकांविरुद्ध प्रतिकार विकसित केला आहे. अॅझॅडिराक्टिन,किंवा पायरेथ्रॉइडसारख्या ज्यांचा परिणाम वाढविण्यासाठी बर्‍याचशा उत्पादात पायपरॉनिल ब्युटॉक्साइडबरोबर संयोग केला जातो अशी संयुगे परिणामकारक स्पर्शजन्य कीटनाशकात येतात.

कशामुळे झाले

टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस आणणार्‍या विषाणूंचे वहन वेस्टर्न फ्लॉवर थ्रीप्स (फ्रँकलिनिएला ऑक्सिडेन्टालिस), कांद्यावरील फुलकीडे (थ्रीप्स टाबासी) आणि मिरचीवरील फुलकीडे (स्किर्थोथ्रीप्स डोरसालिस) सारख्या फुलकिड्यांच्या विविध प्रजाती करतात. फुलकीडे टीएसडब्ल्युव्ही वाहकांतही सक्रिय असतात आणि त्यांचे वहन सातत्याने करतात. पिल्ले विषाणूंना झाडाच्या संक्रमित भागातील रससोषण करताना उचलतात आणि जीवनभर त्यांचे वहन करण्याची क्षमता राखतात. तथापी, टीएसडब्ल्युव्हीचे वहन संक्रमित माद्यांकडुन अंड्यात होऊ शकत नाही. या विषाणूचा टोमॅटो, मिरची, बटाटे, तंबाखु, लेट्युस आणि इतर अनेक वनस्पतीचा समावेश अतिशय विस्तृत यजमान श्रेणी आहे.


प्रतिबंधक उपाय

  • फुलकीडे आणि टीएसडब्ल्युव्हीचे चांगले व्यवस्थापन करणार्‍या रोपवाटिकेतुन रोपे घ्या.
  • पर्यायी यजमानांजवळ किंवा विषांणूंनी संक्रमित केलेल्या रोपांजवळ लागवड करणे टाळा.
  • फूलकिड्यांच्या उपस्थितीसाठी रोपांचे नियमित निरीक्षण करा.
  • टोमॅटोचे प्रतिकारक वाण लावा कारण त्यावर विषाणूंचा प्रसार होण्यापासुन रोखण्यासाठी फूलकिड्यांविरुद्ध कीटनाशकांचा उपयोग करावा लागत नाही.
  • फुलकिड्यांच्या उपस्थितीसाठी रोपांची चोखपणे तपासणी करा.
  • अधिक प्रमाणात फुलकीडे पकडण्यासाठी मोठ्या संख्येने चिकट सापळे लावा.
  • शेतात आणि आजुबाजुने तण नियंत्रण चोखपणे करा.
  • उच्च अतिनील किरणे परावर्तन करणारे पदार्थ (धातु असणारे अच्छादन) वापरुन फुल किड्यांना पळवुन लावा.
  • संक्रमित झाड पाळामुळासकट काढुन नष्ट करा.
  • रोपांना पाणी भरपूर द्या आणि नत्रयुक्त खतांचा अधिक वापर टाळा.
  • दोन पीकांमधील काळात हरितगृह वाफेने निर्जंतुक करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा