उडीद आणि मूग

उडद पिकावरील पाने सुरकुतवणारा विषाणू

ULCV

विषाणू

थोडक्यात

  • तिसरे त्रिकोणाकृती पान आकाराने मोठे होऊन फिकट हिरव्या रंगाचे होते.
  • पाने आक्रसण्याची आणि सुरकुतण्याची चिन्हे दर्शवितात आणि खडबडीत व जाड होतात.
  • संक्रमित झाडची वाढ खुंटते व फुलधारणा विकृत होते.
  • शेंगा आणि दाण्यांची निर्मिती खूप कमी होऊन उत्पादनात मोठी घट होते.

मध्ये देखील मिळू शकते


उडीद आणि मूग

लक्षणे

संसर्गित बियाणांपासुन वाढलेल्या रोपांचे तिसरे त्रिकोणाकृती पान नेहमीपेक्षा खूपच मोठे असते. ही पाने नेहमीपेक्षाही फिकट हिरव्या रंगाची असतात. देठ छोटे असु शकतात आणि पानांच्या शिरा जाड असतात ज्यावर विशिष्ट लालसर रंगहीनता येते. पेरणीनंतर एका महिन्यातच पाने आक्रसण्याची आणि सुरकुतण्यास सुरवात होते आणि खडबडीत व जाड होतात. किड्यांद्वारा संसर्गित झालेले झाड वाढीच्या नंतरच्या काळात नवीन पानांवर लक्षणे दाखवु लागतात पण जुनी पाने ती दर्शवित नाहीत. पानांच्या शिरा पिवळ्या पडतात व फुलधारणा विकृत होते. फुलकळी बारीक पडते आणि खुंटलेली वाढ दृष्टीस पडते. काही थोड्या सुपिक फुलांपासुन आलेल्या शेंगात रंगहीनता आणि मोठ्या आकाराच्या बिया दिसतात. परागकण प्रजनन आणि शेंगा निर्मिती यावर गंभीर परिणाम होतो, परिणामी उत्पादनाचे मोठे नुकसान होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध जैविक उपाय मदत करतात. जमिनीवर किंवा झाडांवर स्युडोमोनस फ्ल्युरेसेन्सची फवारणी केल्याने वाहकांची संख्या कमी होते. ताजे ताक आणि केसिन ह्या रोगाच्या प्रसारावर परिणाम करते असे आढळून आले आहे. बरेचशा झाडांचे अर्क जेसे कि मिराबिलिस जलापा, कॅथारान्थ्नस रोसियस, धतुरा मेटल, बोगनविला स्पेक्टाबिलिस, बोरहाविया डिफ्युसा आणि अझॅडिराक्टा इन्डिकाच्या वापराने भागातील विषाणूच्या प्रादुर्भावावर परिणाम होतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या विषाणू विरुद्ध कोणतेही रसायनिक उपाय उपलब्ध नाहीत पण सिस्टमिक कीटनाशकांच्या वापराने वाहकांची संख्या नियंत्रणात आणता येते. ज्या उत्पादात इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्युएसचे ५ मि.ली./किलोने बियाणांवर थर देण्याची शिफारस करण्यात येते. डायमिथोएटवर आधारीत कीटनाशकांचे पानांवरील फवारे मारावेत. संयुगे २, ४-डायक्झोहेक्झाहायड्रो १, ३, ५-ट्रायाझिन (डीएचटी) वापरल्याने विषाणूंच्या प्रसारात अडथळा निर्माण होते आणि त्यांचा कार्यरत होण्याचा काळ वाढतो.

कशामुळे झाले

विषाणू बहुधा बियांमध्ये असतात, ज्याने नविन रोपांमध्ये प्राथमिक संसर्गाचे लक्षण दिसुन येते. रसशोषण करणार्‍या कीटकांमुळे जसे कि माव्याच्या काही प्रजाती (उदा. अॅफिस क्रसिवोरा आणि अॅ. गॉसिपिल), पांढरीमाशी (बेमिशिया टाबासी) आणि पाने खाणारा भुंगे (हेनोसेपिलाचना डोडेकास्टिगमा) एका झाडातून दुसऱ्या झाडात दुय्यम संसर्ग होतो. विषाणूंचा प्रसार किती होईल आणि रोगाची तीव्रता किती गंभीर राहील हे झाडाच्या प्रतिकार क्षमतेवर, शेतातील वाहक संख्येवर आणि त्यावेळच्या हवामानावर अवलंबुन असते. संसर्गाच्या वेळेनुसार विषाणू ३५ ते ८१% पर्यंत उत्पादन कमी करू शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासुन धरलेले किंवा प्रमाणित रोगमुक्त बियाणे वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असलेले सहनशील किंवा प्रतिकारक वाण वापरा.
  • रोगाचे वहन करणाऱ्या किडींसाठी झाडाचे किंवा शेताचे निरीक्षण करा.
  • संक्रमित झाडे उपटून पुरुन टाका.
  • आपल्या पीकाच्या आजुबाजुला तण जास्त वाढु देऊ नका (तण हे पर्यायी यजमानाचे काम करतात).
  • अडथळा पिके जसे कि मका, ज्वारी आणि बाजरी लावा ज्याने रोगाचा प्रसार कमी होईल.
  • काढणीनंतर झाडाचे अवशेष काढुन जाळुन टाका.
  • रोगवाहकांना कमी संवेदनशील असणाऱ्या पिकांसोबत पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा