भात

टंग्रो रोग

RTBV

विषाणू

थोडक्यात

  • वाढ खुंटते.
  • कांडे कमी येतात.
  • पाने पिवळी होऊन त्यावर बारीक, गडद तपकिरी धब्बे दिसतात.
  • पलाशाच्या कमतरतेशी गल्लत होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

झाडांना लागण आरटीबीव्ही आणि आरटीएसव्ही दोन्ही विषाणूंची मिळुन किंवा एकेकट्या विषाणूमुळेही होऊ शकते. या रोगाचे वहन भातावरील हिरव्या तुडतुड्यांनी होते. दुहेरी लागण झालेली झाडे विशेष 'टंग्रो लक्षणे' दर्शवितात ज्यात झाडाची वाढ खुंटणे आणि कांडे कमी येणेही येते. त्यांची पाने पिवळी किंवा नारिंगी पिवळी पडतात ज्याची सुरवात टोकापासुन होऊन खालच्या भागापर्यंत जाते. रंगहीन पानांवरही अनियमित, बारीक, गडद तपकिरी धब्बे असु शकतात. कोवळ्या रोपांवर शिरांमधील पिवळेपणा दिसु शकते. सौम्य लक्षणे आरटीबीव्ही किंवा आरटीएसव्ही अशा एकट्या विषांणुची लागण झाली असता ( उदा. अगदी थोडीशीच वाढ खुंटणे आणि पाने पिवळी पडत नाहीत) दिसतात. ह्याच्या लक्षणांची पलाशाच्या कमतरतेशी गल्लत होऊ शकते पण टंग्रो शेतात गटागटाने येतो तर पलाशाची कमतरता पूर्ण शेतात पसरलेली दिसते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

प्रकाश सापळे हिरव्या तुडतुड्या वाहकाला आकर्षित आणि नियंत्रित करण्यासाठी तसेच त्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी यशस्वीरीत्या वापरले गेले आहेत. पहाटे, प्रकाश सापळ्याजवळ तुडतुडे मोठ्या संख्येने येतात तेव्हा त्यांना पकडुन त्यांची व्हिल्हेवाट लावली पाहिजे किंवा कीटनाशके फवारणी किंवा धुरळणी करून त्यांना मारले पाहिजे. हे दररोज केले पाहिजे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ब्युप्रोफेनझिन किंवा पायमेट्रोझाइनवर आधारीत कीटनाशक रोपणीनंतर १५ आणि ३० दिवसांनी वेळेत केले असता काम होते. पण तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी कीटनाशकांचा वापर बहुधा परिणाम देत नाही कारण हिरवे तुडतुडे सतत एका शेतातुन दुसऱ्या शेतात फिरतच असतात आणि थोड्याच काळात टंग्रोचा प्रसारही झपाट्याने करीत असतात. म्हणुन शेताच्या आजुबाजुच्या वनस्पतींवरही कीटनाशकांचे फवारे मारण्याची गरज आहे. क्लोरपायरिफॉस, लँब्डा सायहॅलोथ्रिन किंवा इतर कृत्रिम पायरेथ्रॉइडच्या संयुगांवर आधारीत उत्पाद वापरणे टाळा ज्याला तुडतुड्यांनी थोडा प्रतिकार निर्माण केला आहे.

कशामुळे झाले

विषाणुंचे वहन नेफोटेटिक्स विरेसेन्स नावाच्या तुडतुड्याद्वारे होते. टंग्रो अधिक उत्पादन देणारे वाण ज्यामध्ये वाढीचा काळ कमी असतो ज्यामुळे शेतकरी वर्षांतुन भाताची दोन पीके घेऊ शकतात अशा शेतात जास्त आढळतो. एकदा का भाताला टंग्रोची लागण झाली तर ती बरी करता येत नाही. प्रतिबंधक उपाय थेट रोग नियंत्रणापेक्षा जास्त परिणामकारक आहेत. टंग्रो त्या शेतात का येतो त्यामागे दोन पीके घेण्याची प्रणाली आणि भाताचा अनुवांशिक एकसारखेपणा ही मुख्य कारणे आहेत. पाणथळीतील भातशेती ही कोरडवाहू भातशेती किंवा उतारावर केलेल्या भातशेतीपेक्षा या रोगाच्या विकसित होण्याला जास्त संवेदनशील आहेत. रोपाचे अवशेष आणि धस्कट देखील लागणीचे स्त्रोत आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • या रोगास वहन करणाऱ्या वाहकांविरुद्ध प्रतिकार पातळी असलेले वाण वापरा.
  • वाहकांची संख्या कमी असलेल्या महिन्यात दोन लागवडी करा.
  • यजमान नसणार्‍या पिकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • प्रत्येक क्षेत्रात जवळजवळ समकालिक वाढ सुनिश्चित करण्यासाठी लागवड एकाच वेळी करा.
  • नांगरणीद्वारे अंडी आणि प्रजनन स्थळे नष्ट करा.
  • मित्र किड्यांचे संवर्धन करण्याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा