लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील पिवळा खुज्या विषाणू रोग

CCDV

विषाणू

थोडक्यात

  • कोवळ्या पानांच्या टोकांवर V आकाराची खाच तयार होते ज्यामुळे पाने खालच्या दिशेने वळतात.
  • पोषकांच्या कमतरतेमुळे पाने गोळा होतात.
  • पेऱ्यातील अंतर कमी झाल्यामुळे झाडे खुजी आणि झुडुपासारखी दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

कोवळ्या पानांच्या टोकांवर एका किंवा दोन्ही बाजुला V आकाराची खाच तयार होते आणि टोके हळुहळु खालच्या दिशेने गोळा होतात. जुनी पाने लहान आणि सुरकुतलेली असतात. झाडांच्या फांद्या देखील दुमडणे, बेढब होणे किंवा पाने खोलगट उलट्या पेल्यासारखी होणे अशी विविध विकृती दर्शवितात. पिवळे ठिपके किंवा पाने सुरकुतणे देखील सर्वसामान्य असते आणि हे मुख्यत: पोषणाच्या कमतरतेमुळे होते जी रोगाचा परिणाम आहे. प्रभावित कोवळ्या झाडात पेऱ्यातील अंतर कमी झाल्यामुळे ती झुडपासारखी आणि खुजी असतात. मोठ्या झाडाच्या पहिल्या किंवा दुसर्‍या वाढीच्या नविन पालवीच्या काही भागातच ही लक्षणे संक्रमणानंतर ५ ते ८ अठवड्यानी दिसतात. २० ते २५ डिग्री सेल्शियस तापमानात लक्षणे विकसित होतात आणि ३० ते ३५ डिग्री सेल्शियस तापमानात चांगलीच स्पष्ट होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सीसीडीव्हीच्या गंभीर घटना कमी करण्यासाठी कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूजन्य रोगांना रसायनिक उपचार केले जाऊ शकत नाहीत. असेटामप्राईड, बुप्रोफेजीन आणि पैरीप्रोक्झीफेन सारखे सक्रिय घटक असणारे कीटकनाशक वापरून बेबेरी पांढरी माशी (पॅराबेमिसिया मायरिके), या वाहकाचे नियंत्रण केले जाऊ शकते.

कशामुळे झाले

लिंबुवर्गीय पिकांवरील पिवळा खुज्या विषाणू (सीसीडीव्ही) मुळे ही लक्षणे उद्भवतात. संक्रमणाच्या पहिल्या वर्षात, झाडाला फुले आणि फळे नेहमीप्रमाणेच येतात पण नंतरच्या वर्षात त्यांची मात्रा बरीच कमी होते, जे झाडाचा कमी झालेला जोम दर्शविते. हा विकार कलमांद्वारे होतो असे समजले जाते. पण असेही दिसुन आले आहे कि वाहक किडे, बेबेरी पांढरी माशी (पॅराबेमिसिया मायरिके) याचा प्रसार तीव्रतेने दूरवर करतात. लिंबुवर्गीय पिकातील काही जातींवर याला खूप गंभीर नुकसानकारक मानले जाते कारण फळांचा आकार आणि संख्या कमी झाल्यामुळे काही वेळा गंभीर नुकसान (ग्रेपफ्रुटवर ५०%) दिसुन आले आहे. काही प्रजातीत या रोगाविरुद्ध थोडा प्रतिकार (गोड संत्री) विकसित झाला आहे पण संक्रमित लक्षण विरहित रोपे स्त्रोताचे कारण बनतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या देशातील क्वारंटाईन नियम तपासा.
  • रोगाचा प्रसार टाळण्यासाठी प्रमाणित स्त्रोतांकडुन जंतुविरहित लिंबुवर्गीय रोपांची सामग्री घेणे फार महत्वाचे आहे.
  • झाडांना हाताळताना हत्यारे आणि कामगारात उच्च प्रतीची स्वच्छता बाळगावी.
  • संक्रमित लागवड सामग्रीची लागवडीच्या क्षेत्रातुन ने-आण करु नये.

प्लँटिक्स डाऊनलोड करा