द्राक्षे

द्राक्षांच्या वेलींच्या पानांची गुंडाळी करणार्‍या किड्यांचा रोग

GLD

विषाणू

थोडक्यात

  • लाल द्राक्षांच्या प्रकारात पानांच्या शिरांच्या मधला भाग गडद लाल रंगाचा होतो आणि पांढर्‍या द्राक्षांच्या प्रकारात तो पिवळा पडतो.
  • पानांच्या टोकाकडे आणि पानांच्या कडांच्या गुंडाळ्या होतात.
  • पीक कमी येते, देठ किंवा फांद्या छोट्या असतात आणि झाडोरा कमी होतो.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

द्रांक्षांच्या प्रकारांची ह्या रोगजंतुबरोबरच्या संवेदनशीलतेप्रमाणे लक्षणे फार वेगळी असु शकतात आणि ती उन्हाळ्यात उशीरा किंवा शरदात स्पष्ट दिसतात. लाल द्राक्षांत पानांच्या शिरांमधील टिश्यु गडद लास ते जांभळा होतो आणि पानांच्या कडा खालुन गुंडाळतात किंवा कपासारख्या आकाराचे पान दिसते. सफेद द्राक्षांत, पानांच्या शिरांमधील टिश्यु पिवळे पडतात आणि पाने गुंडाळतात किंवा कपासारख्या आकाराची होतात. सामान्यत: मुख्य शिरा हिरव्या रहातात, जरी काही वेळा रंगहीनता पूर्ण पानाच्या टिश्युला येते. वेलीचे पीकही कमी येते, देठ आणि फांद्या छोट्या असतात तसेच झाडोराही कमी होतो. काही वर्षांनंतर रोगाच्या परिणामाने फळे उशीरा पिकतात किंवा पूर्ण भाग समानतेने पिकत नाही, कमी गोड असतात, रंगहीनता दिसते आणि आम्ल जास्त असते. काही वर्षांनंतर द्राक्षांची वेल रोगट झाल्याचे स्पष्ट दिसते, ज्यामुळे बाधीत शेताचे आयुष्य कमी होते. जगभरात द्राक्षांच्या वेलीवरील हा गंभीर रोग फारच महत्वाचा आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

द्राक्षांच्या वेलींच्या पानांची गुंडाळी करणार्‍या किड्यांच्या रोगांवरील कोणतेही पर्यायी उपचार आम्हास ठाऊक नाहीत, माफ करा. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. हवेतुन पसरणार्‍या रोगाला रसायनिक उपाय वापरुन उपचार करता येत नाहीत. वेलींच्या शेतात ठिबक सिंचन, इमिडाक्लॉरिड मिलिबग्जविरुद्ध मोसमात केव्हाही वापरले जाऊ शकते. ज्या शेतात ठिबक सिंचन वापरले जात नाही तिथे थियामेथोक्झाम, अॅसेटामिप्रिड फवारणीसाठी आणि डायनोटेफ्युरान असणारे उत्पाद पानांवरील खोडांवर आणि वेलीच्या मुख्या फांद्यांवर वापरले जाऊ शकतात. मिलिबग्ज आणि स्केल्ससाठी इतर रोगजंतुविषयक आणि जैविक सवयी वापरुन मिलिबग्ज आणि स्केल्सना आळा घालता येतो.

कशामुळे झाले

द्राक्षांच्या वेलीवरील पानांची गुंडाळी होण्यार्‍या रोगाची लक्षणे ही दहा विविध रोगजंतुंच्या जातींमुळे होतात ज्यांना एकत्रितपणे द्राक्षांच्या वेलीवरील पानांची गुंडाळी करणारे रोगजंतु म्हणुन ओळखले जाते. झाडोर्‍यातुन रोगाचा प्रसार, बाधीत वेलींची सामग्रीचे वहन आणि कलम ह्या विविध प्रकारे रोगाचा प्रसार दूरवर होऊ शकतो. अाणि दोन वाहक किडे मिलिबग्ज आणि सॉफ्ट स्केल्ससुद्धा ह्या रोगजंतुन विविध वेलींमध्ये किंवा शेतात पसरवु शकतात. हे रोगजंतु अवजारांवरुन वहन केले जात नाहीत उदा. छाटणीचे साहित्या किंवा कापणी करणारी यंत्रे किंवा ते बियाणांतुनही पसरत नाहीत. फॉस्फरस आणि पोटॅशियमची कमतरतेची लक्षणेही द्राक्षांच्या वेलीवरील पानांच्या गुंडाळ्या करणार्‍या रोगासारखीच दिसतात. म्हणुन रोगाच्या व्यवस्थापनाचे उपाय ठरविण्याआधी संसर्ग हाच आहे का ह्याची पुष्टी करणे गरजेचे असते.


प्रतिबंधक उपाय

  • जर आपल्या देशात लागु होत असेल तर क्वारंटाइन नियम तपासा.
  • लिफरोल जंतुंपासुन मुक्त बियाणे प्रमाणित स्त्रोतांकडुन निवडा.
  • जर उपलब्ध असेल तर ह्या रोगास प्रतिरोधक बियाणे निवडा.
  • ह्या रोगाच्या लक्षणासाठी शेतावर नजर ठेवा.
  • त्याचबरोबर मिलिबग्ज आणि सॉफ्ट स्केल्ससाठीही शेतावर लक्ष ठेवा.
  • जर शंका आली तर आपल्या वेलींची प्रयोगशाळेतुन चाचणी करवुन घ्या.
  • बाधीत वेलींना, मुळासकट काढुन टाका.
  • कलम करायचे असल्यास वरती कलम करणे टाळा कारण मुळे बाधीत असु शकतात.
  • संभाव्य बाधीत वेलींची सामग्री इतर वेलींच्या शेतात नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा