CEVd
विषाणू
संवेदनशील मातृवृक्षावर तयार केलेल्या झाडांवर जेव्हा ती ४ वर्षांची होतात तेव्हा लक्षणे विकसित होतात. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे खोडावर खपल्या धरतात, झाडीत खूप जास्त पिवळेपणा दिसतो आणि रोपाची वाढ चांगलीच खुंटलेली असते. कलम केलेल्या जागेच्या थोड खालील खोडावर भेगा पडतात आणि साल निघते. पॉनसिरस ट्रिफोलियाटा (ट्रिफॉलियेट ऑरेंज)च्या मातृवृक्षावर लावलेली झाडे सर्वात जास्त प्रभावित होतात. सिट्रेंजच्या मातृवृक्षावर लावलेली झाडात वाढ खुंटण्याची लक्षणे थोडी उशीराने दृष्य होतात आणि खोडावरील खपल्यांची लक्षणे सहजा दर्शवित नाहीत. इतर संवेदनशील मातृवृक्षात दिसणारी इतर लक्षणे आहेत, एकुणच झाडाचा जोम कमी राहणे आणि कलमाच्या खालच्या बाजुला खोडाच्या खपल्या पडणे. एक्झोकॉर्टिसचा प्रभाव फळांच्या प्रतीवर पडत नाही पण प्रकाश्संस्लेषणच्या कमी दरामुळे पीकाचे उत्पादन चांगलेच घटते.
या विषाणूंविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. लिंबूवर्गीय पिकांच्या लागवडीत वापरण्यात येणारी हत्यारे आणि अवजारे १% ब्लीचचे द्रावण (१% उपलब्ध क्लोरीन) वापरुन निर्जंतुक करावीत.
एक्झोकॉर्टिस व्हिरॉइड रोगामुळे लक्षणे उद्भवतात. हे बहुधा सर्वच लिंबुवर्गीय पिकांमध्ये उपस्थित असतात पण त्याची लक्षणे सर्व पिकात विकसित होत नाहीत. लक्षणे तेव्हाच दिसतात जेव्हा कलम संवेदनशील मातृवृक्षावर (ट्रिफॉलियेट ऑरेंज, सिट्रेंज) केले जाते. व्हिरॉइड झाडाच्या रसात असते आणि म्हणुन एका झाडावरुन दुसर्या झाडावर कलम किंवा डोळा भरणीद्वारे संक्रमित होते. मुळांचे एकमेकांवर नैसर्गिकरीत्या ग्राफ्टिंग (कलम) झाल्याने देखील रोगाचा प्रसार होतो. इतर लिंबुवर्गीय विषाणूंच्या विरुद्ध एक्झोकॉर्टिसचा प्रसार झाडाचे रससोषण करणाऱ्या वाहक किड्यांद्वारे होत नाही कारण या रोगाचे कोणतेही वाहक किडे पाहण्यात आले नाहीत. बियांणांद्वारे संक्रमण देखील माहितीत नाही. एक्झोकॉर्टिस व्हिरॉइड रोग उच्च तापमान आणि कोरड्या वातावरणाला प्रतिकार करतो आणि लागवड सामग्री तसेच हत्यारे वगैरेंवर फार काळासाठी संक्रमण करण्याच्या स्थितीत राहू शकतो.