CPsV
विषाणू
लिंबुवर्गीय पिकांवरील रिंग स्पॉट विषाणू रोगाच्या लक्षणांबरोबर गल्लत करु नका. ते पान, फळ, साल, खोड, मूळ आणि फांद्यावर दिसतात. पानांवर पिवळे ठिपके किंवा डागांपासुन ते फोडांच्या रूपाने मलिनता इथपर्यंत विविध प्रकारची लक्षणे दिसतात. जशी पाने मोठी होतात तशी लक्षणे देखील विरळ होत जातात. सोरोसिसने संक्रमित केलेल्या फळांवर वर्तुळाकार पिवळी संरचना दिसु शकते. तथापि, रोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे खोडाच्या सालीचा र्हास होणे होय. याची सुरवात बहुधा फोड किंवा पुटकुळ्यांनी होते ज्या वाढुन फुटतात आणि परिणामी खोडाच्या सालीवर मोकळे भाग दिसु लागतात आणि साल फुलुन येते. खपली किंवा सोलवटणे नंतर वाढुन पूर्ण खोड आणि मुख्य फांद्यांपर्यंत पसरते. डागांच्या कडा जवळ चिकट स्त्राव दिसुन येतो. संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यांवर खोडाचे आतील थर आणि लाकुड यातही हा चिकट स्त्राव शिरतो आणि खोड वाळते.
आज पर्यंत तरी या रोगाची गंभीरता किंवा घटना कमी करण्यासाठी कोणतेही जैविक उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस माहिती असले तर आम्हाला जरुर कळवा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणू रोग कोणात्याही रसायनिक उपचारांनी नियंत्रित केले जाऊ शकत नाहीत. जर सोरोसिस बागेत उपस्थित असेल तर छाटणीच्या किंवा कलमांच्या हत्यारांचे ब्लीच वापरुन निर्जंतुकीकरणाची सवय बाळगली पाहिजे. रोगाचा प्रतिबंध करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रमाणित, रोगमुक्त कलमे घेणे.
सिट्रस सोरोसिस विषाणूंमुळे ही लक्षणे उद्भवतात, ज्याला जगभरात लिंबुवर्गीय पिकावरील सर्वात हानीकारक विषाणू मानले जाते. ह्याचे वहन मुख्यत: संक्रमित कलमांद्वारे किंवा संक्रमित कलम करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांद्वारे होते. कधीकधी, रोगाचा प्रसार नैसर्गिक मुळांच्या कलमांद्वारे संक्रमित झाडापासुन निरोगी झाडावर होतो. सिट्रेंज प्रकारची काही बियाणे या रोगाचे वहन करीत असल्याची माहिती आहे. ओलपिडियम ब्रेसिके बुरशीद्वारा किंवा अजुनपर्यंत तरी माहिती नसलेल्या उडणार्या वाहकांद्वारे नैसर्गिक प्रसाराचेही काही पुरावे आहेत. कलम प्रमाणीकरण कार्यक्रमाद्वारे बर्याचशा भागात सोरोसिसच्या घटना कमी झालेल्या आहेत. नारिंग आणि ग्रेपफ्रुट मुख्यत: प्रभावित होतात पण मँडेरिन, टँगेरिन, लिंबू, पोमेलो आणि मोसंबीवरसुद्धा लक्षणे विकसित होतात.