लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील लेप्रोसिस रोग

Citrus leprosis virus sensu lato

विषाणू

थोडक्यात

  • पानांवर गोलाकार डाग असुन मध्यावर कोळ्यांनी रससोषण केलेला भाग दिसतो.
  • फांद्यांवर बारीक, पिवळे ठिपके दिसतात.
  • दाट गडद ठिपके फळांवर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

विषाणूंमुळे पान, फांद्या आणि फळांवर लक्षणे उद्भवतात. पानावर वैशिष्यपूर्ण मोठे आणि गोलाकार (५-१२ मि.मी. व्यासाचे), फिकट पिवळे ते गडद तपकिरी डाग उमटतात ज्यांचे केंद्र करपट व २-३ मि.मी. व्यासाची असतात. उपद्रवाच्याच्या जागेभोवती पिवळी प्रभावळ दिसते जी १-३ केंद्रीत वर्तुळांची बनलेली असते जे एकमेकांत मिसळु शकतात. जुन्या डागात, गडद केंद्र भाग सुद्धा दिसु शकतात. कोवळ्या फांद्यांवर डाग बारीक, पिवळसर आणि उथळ असतात. कालांतराने ते फांदीभर पसरुन एकमेकात मिसळतात आणि कोरडे गडद तपकिरी किंवा लालसर होतात. वाढीच्या बाजुने कापल्यास डाग फांदीच्या आत देखील पसरलेले असतात. फळांवर गडद खोलगट डाग मोठ्या संख्येने असतात आणि फक्त बाहेरच्या बाजुलाच प्रभावित करतात. फळे अकाली गळु शकतात किंवा विक्रीयोग्य राहत नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ब्रेव्हिपॅल्पस वाहक कोळ्य‍ांच्या जाती जिथे आढळतात तिथेच त्यांचे भक्षक देखील असतात. युसियस, अॅम्ब्लिसियु, फायटोसेयुलस किंवा आयफिसियोडेस झुलुयागायसारखे फायटोसिडे जातीचे कोळी लिंबुवर्गीय पीकांवरील वाहक बी. फोएनिक्स कोळ्य‍ाचे नैसर्गिक शत्रु आहेत. मेटार्हिीझियम किंवा हिर्स्युटेला थॉम्पसोनिल सारखी बुरशी वापरून देखील या कोळीची लोकसंख्या कमी केली जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सिट्रस लेप्रोसिस विषाणूंचे वहन करणार्‍या कोळ्यांविरुद्ध अॅक्रनॅट्रिन, अझोसायक्लोटिन, बायफेनट्रिन, सायहेक्झाटिन, डायकोफॉल, हेक्झिथियाक्जॉक्स, फ़ेनब्युटाटिन ऑक्साइड सक्रिय घटक असणाऱ्या कोळीनाशकांच्या वापराची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

तीन विषाणूंच्या गटामुळे लक्षणे उद्भवतात, त्यामुळेच सर्व लिंबुवर्गीय यजमानांमध्ये ही लक्षणे उद्भवतात. या विषाणूंचे वहन ब्रेव्हिपॅल्पस कुटुंबातील बर्‍याच कोळ्‍यांमुळे कमी कार्यक्षमतेसह होते. उदा. कॅलिफोर्नियातील माहितीत असणारे तीन वाहक कोळी आहेत बी. कॅलिफोर्निया, बी. ओबोव्हॅटस आणि बी. फोनेसिक, यातील शेवटचा मुख्य वाहक आहे. लिंबुवर्गीय पिकांव्यतिरिक्त त्यांच्या यजमानांची मोठी श्रेणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर वितरित आहेत. जरी अळ्या विषाणूंचे सर्वात जास्त कार्यक्षमतेने वहन करतात असे अहवाल असले तरी कोळ्याचे सर्व जीवनटप्पे (अळ्या, पिल्ले आणि प्रौढ) या विषाणूंचे वहन करतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्त्रोताकडुनच बियाणे आणि कलमे घ्या.
  • प्रभावित झाडे काढा किंवा संक्रमित फांद्या छाटुन टाका.
  • बागातील व आजुबाजुने तण नियंत्रण करा.
  • दाट झाडांचे कुंपण तयार करून कोळ्यांचा प्रसार थांबवा.
  • शेतीउपयोगी हत्यारे आणि कामगारात उच्च पातळीची स्वच्छता राखा.
  • संक्रमित लागवड सामग्रीची वाहतूक नियंत्रित करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा