RYMV
विषाणू
कोवळ्या पानांवर विखुरलेले पिवळे ते हिरवे ठिपके येतात. लागण झाल्यानंतर (२ अठवड्यांनी) हे ठिपके लांबुळके होतात आणि पानांच्या शिरांना समांतर वाढतात. या पिवळ्या पट्ट्यांच्या मध्यावर गडद छटा असलेले भाग विकसित होतात. जुन्या पानांवर पिवळी ते नारिंगी रंगहीनता दिसुन येते. झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादन कमी येते.
संक्रमित झाडे व त्यांचे अवशेष खणून जाळुन किंवा गाडुन नष्ट करा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या विषाणुंचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही थेट रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत.
विषाणुंचे वहन विविध प्रकारच्या बीटल्स किंवा ग्रासहॉपर्सद्वारे तसेच, गायी, उंदीर आणि गाढवांद्वारे होते. ह्याचे संक्रमण झाडांमधील रसाच्या हालचालीने उदा. सिंचनाचे पाणी किंवा संक्रमित झाडाची निरोगी झाडांसोबत घर्षणाने आणि पीकांचे नष्ट न केलेले किंवा जमिनीत खोल राहिलेल्या अवशेषांद्वारे वहन होते.