केळी

पर्णगुच्छ (बंचीटॉप) व्हायरस

Bunchy Top Virus

विषाणू

थोडक्यात

  • पानाच्या खालच्या भागात गडद हिरवे पट्टे देठ, मध्यशीर आणि दुय्यम शिरांवर उमटतात.
  • मोर्स कोड पॅटर्न (जाड गडद हिरवे ठिपके आणि रेषा) कालांतराने पानाच्या शीरांना समांतर विकसित होतात.
  • संक्रमित पानांची वाढ खुंटलेली, सडपातळ आणि ताठ असुन त्यांच्या कडा गोळा झालेल्या आणि पिवळ्या असतात.
  • शेंड्यावर छोटी फिकट हिरवी पाने दिसतात ज्यांचा "पर्णगुच्छ" तयार होतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

विषाणू झाडाच्या सर्व भागांना वाढीच्या सर्व टप्प्यांवर प्रभावित करु शकतो. देठ, मध्यशीर आणि नविन पानांच्या खालच्या बाजुच्या शीरांवर गडद हिरवे पट्टे येणे हे सुरवातीच्या लक्षणात येतात. कालांतराने इतर पानांवर देखील हे बारीक गडद हिरवे ठिपके आणि रेषा (मोर्स कोड पॅटर्न) शीरांच्या समांतर येतात. संक्रमित पानांची वाढ खुंटलेली, सडपातळ आणि ताठ असुन त्यांच्या कडा गोळा होऊन पिवळ्या पडून नंतर करपतात. गंभीर संक्रमणात नविन पानांत ही लक्षणे फारच खालावलेली दिसतात. या रोगाचे वैशिष्ट म्हणजे शेंड्यावरील छोटी फिकट हिरवी किंवा पिवळी पाने एकत्रित गोळा होऊन पर्णगुच्छ बनवितात. एकुणच वाढ खुंटते आणि झाडाला घड किंवा फळे येत नाहीत, जर आलीच तर फळे विकृत आकाराची आणि लहान असतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जर रोग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आढळून आला, तर साबण पाणी किंवा कीटकनाशक साबणाने झाडे फवारणीद्वारे भिजवून काढल्यास माव्याची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकेल.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूजन्य रोगांसाठी कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. माव्यांची संख्या सायपरमेथ्रिन, अॅसेटामिड, क्लोरपायरिफॉस किंवा संबंधित कीटकनाशके वापरुन काही प्रमाणात केले जाऊ शकते. जर बागेतील प्रभावित झाड निवडून काढत असाल तर त्यांवरील सर्व माव्यांना मारण्यासाठी रॉकेल किंवा कीटकनाशकांचा वापर करा.

कशामुळे झाले

विषाणूंमुळे लक्षणे उद्भवतात ज्यांचे वहन एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर किंवा एका बागेतून दुसऱ्या बागेत केळीवरील माव्याद्वारे (पेंटालोनिया निग्रोनेरव्होसा) होते. मोठ्या अंतरावरील संक्रमण संक्रमित लागवड सामाग्रीचे एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रात वहनाद्वारे होते. आले, हेलिकोनिया आणि टॅरो हेही या विषाणूचे यजमान आहेत. केळीचे वाण त्यांच्या संवेदनशीलतेमध्ये भिन्न असतात, हा फरक प्रामुख्याने लक्षणे किती काळात दिसतात हाच आहे. झाड या संक्रमणातुन सावरु शकत नाहीत. संक्रमित रोपांद्वारे झालेले प्राथमिक संक्रमण हे माव्यांद्वारे झालेल्या दुय्यम संक्रमणापेक्षाही बहुधा वाईट असते. वसंत ऋतुत किंवा ऊबदार, कोरड्या हवामानात लक्षणे जास्त ठळकपणे दिसुन येतात.


प्रतिबंधक उपाय

  • सुदृढ लागवडीची सामग्री प्रमाणित स्त्रोतांकडुनच घ्या.
  • जास्त सहनशील वाण उपलब्ध असल्यास लावा.
  • झाडांचे नियमित निरीक्षण करा आणि संक्रमित झाडांसाठी लक्ष ठेवा.
  • सर्व संक्रमित केळीची झाडे काढा आणि त्यांना उन्हात वाळवुन पुरून टाका.
  • आले, हेलिकोनिया आणि टॅरोसारखी स्वयंभू आणि पर्यायी यजमान झाडे नियंत्रित करा.
  • विविध लागवडी दरम्यान केळी मुक्त भाग तयार करा.
  • विविध प्रदेशांमध्ये केळीच्या रोपांचे वहन करणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा