BBrMV
विषाणू
सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे फुलोऱ्याला झाकणाऱ्या लहान पानांवर लालसर तपकिरी ठिगळांची संरचना दिसते. फुलांच्या घडांना झाकणाऱ्या लहान पानांना ब्रॅक्टस म्हणतात. कोवळ्या रोपांवर पिवळे किंवा लाल तपकिरी फिरकीच्या आकाराचे डाग आणि रेषा पानाचे देठ, मध्यशिरेवर पाहिले जाऊ शकतात. क्वचितच ते पानातील शिरांना समांतर किंवा घडाच्या देठावर देखील दिसु शकतात. वाळलेली पाने ओढुन काढली असता गडद तपकिरी डाग किंवा छटा आतील भागांवर दिसतात. घड व्यवस्थित न वाढणे आणि फळे विकृत आकाराची असणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहेत. विषाणूंचा प्रसार झपाट्याने होते आणि गंभीर संक्रमणात उत्पादन आणि प्रत देखील घटते.
माव्याची संख्या कमी करण्यासाठी व्हर्टिसिलियम लेकानि सारख्या जैविक नियंत्रक बुरशीचा उपयोग केला जाऊ शकतो. माव्यांची संख्या जास्त नसल्यास कीटकनाशक साबण वापरल्याने देखील नियंत्रण होऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणुजन्य रोगांसाठी कोणतेही रसायनिक थेट उपचार उपलब्द नाहीत. तरीपण माव्यांच्या संख्या नियंत्रित करण्यासाठी काही प्रमाणात कीटकनाशकांचा (उदा. सायपरमेथ्रिन, अॅसेटामिड, क्लोरपायरीफॉस) उपयोग केला जाऊ शकतो. तणनाशकांचा वापर करून संक्रमित झाड किंवा त्यांचे मुनवे नियंत्रित केले जाऊ शकतात.
लक्षणे विषाणूमुळे उद्भवतात जे केळीच्या झाडाला विविध वाढीच्या टप्प्यावर प्रभावित करु शकतात. याचा प्रसार तुरळकरीत्या माव्याच्या बरेच प्रजाती करतात. रससोषण करताना हे विषाणू उचलले जातात पण वाहकामध्ये खूप कमी वेळ जगु शकतात. एका शेतातुन दुसर्या शेतात संक्रमित लागवड सामग्रीचे वहन किंवा हस्तांतरण करणे हा संक्रमणाचा दुसरा मार्ग आहे. पुष्पकोषावरील ठिगळ संरचनेच्या वैशिष्ट्यामुळे हे सामान्य नाव पडले आहे.