केळी

केळीवरील स्ट्रीक व्हायरस

Banana Streak Virus

विषाणू

थोडक्यात

  • पिवळ्या रेषा पानांच्या मध्यशिरेपासुन ते कडांपर्यंत दिसतात.
  • नंतर तपकिरी किंवा काळ्या पडतात आणि अधुनमधुन पिवळे धब्बे दिसतात.
  • पानांच्या कडांपासुन करपणे सुरु होऊन मध्यशीरेपर्यंत पसरते.
  • वाढ खुंटलेली असते.

मध्ये देखील मिळू शकते


केळी

लक्षणे

विषाणूचे प्रकार आणि त्यांची मात्रा, वाण आणि हवामान परिस्थिती याप्रमाणे रोगाची लक्षणे वेगवेगळी असु शकतात. सर्वासामान्य लक्षण म्हणजे एक समान किंवा तुटक पिवळ्या रेषा पानांच्या मध्यशिरेपासुन ते कडांपर्यंत दिसतात. हे पट्टे नंतर तपकिरी किंवा काळे पडतात आणि अधुनमधुन पिवळे धब्बे किंवा डोळ्याच्या आकाराची संरचना दिसु शकते. पानांवर करपटपणा दिसु लागतो ज्याची सुरवात कडांपासुन होऊन काही वेळेस मध्यशीर आणि देठालाही वेढते. क्वचितच खोडाच्या आतील भाग देखील कुजीने प्रभावित होतात. हे शेवटचे लक्षण खास करुन कमी तापमान आणि लहान दिवस अशा हवामान परिस्थितीत दिसते. सर्व पाने जरी संक्रमित होत नसली तरी झाडाची वाढ बहुधा खुंटते, आणि घड तसेच फळांचे आकार देखील कमी होतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्पस, लेसविंग्ज किंवा हॉवर फ्लाइज आणि लेडी बर्ड सारखे जैविक नियंत्रक घटक वापरुन मिलीबगची संख्या नियंत्रित केली जाऊ शकते. जेव्हा संख्या कमी असते तेव्हा हलके खनिज तेल किंवा निंबोळी अर्काची फवारणीने देखील परिणाम देते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणुजन्य रोगांसाठी कोणतेही रसायनिक उपचार नाहीत. मिलीबगच्या मेणचट आवरणामुळे त्यांचे नियंत्रण कठिण आहे. डेल्टामेथ्रिन सारख्या कीटकनाशकांचा उपयोग मिलीबगच्या संख्या नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

रोग विविध विषाणूंच्या मिश्रणाने होतो. लक्षणांचे स्वरुप झाडातील विषाणूंच्या प्रमाणावर अवलंबुन असते. सर्वसामान्यपणे तापमान आणि हवामान परिस्थितीप्रमाणे संक्रमणाचा प्रभाव ठरतो. एका झाड किंवा बागेवरून दुसऱ्या झाड किंवा बागेवर या रोगाचे संक्रमण मिलीबगच्या (स्युडोकोचिडे) विभिन्न प्रजातींद्वारे होते. लांब अंतरापर्यंतच्या प्रसाराचा आणखीन एक मार्ग म्हणजे संक्रमित लागवड सामग्रीचे वहन होय. हे विषाणु जमिनीत रहात नसल्याने झाडाला मशागतीच्या वेळेस होणार्‍या जखमातुन आत शिरण्याची संभवता कमी आहे. केळी आणि त्याच्या संबंधीत इतर प्रजातींसाठी हा जगभारात होणारा रोग आहे आणि याच्या परिणामांमुळे झाडाची वाढ खुंटते, फळांचे उत्पादन आणि प्रत कमी भरते. विषांणूंचे वहन शेतीउपयोगी हत्यारे आणि अवजारांद्वारे होण्याची संभवता कमी आहे.


प्रतिबंधक उपाय

  • विषाणूमुक्त असलेली लागवडीची सामग्री प्रमाणित स्त्रोतांकडुन घ्या.
  • संक्रमित झाडाला पाळामुळासकट काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा