PapMV
विषाणू
ह्या लागणीची लक्षणे कोवळ्या पानांतच दिसतात आणि ज्यात पानांवर ठिगळ पॅटर्न आणि थोडी विकृत आकाराची होतात. नेहमी पिवळसर हिरव्या पानांवर गडद हिरव्या रंगाचे फोडासारखे डाग दिसतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर पानांच्या शिरा स्पष्ट दिसतात, देट थोडे छोटे दिसतात आणि पाने खालच्या बाजुला मुडपतात आणि सरळ उभी रहातात. रोपाचे इतर भाग (देठ आणि फुले) बाधीत होत नाहीत. रोपाची वाढ थोडी खुंटल्यासारखी दिसते काही वेळा फक्त निरोगी झाडांशी तुलना केल्यासच ते समजते.
शेतातील कामाची हत्यारे आणि अवजारे निर्जंतुक करणे किंवा ओव्हन १५० डिग्री सेल्शियला ठेऊन १ तास तापविल्याने जंतु मरतात. कामाची हत्यारे किंवा हातमोजेसुद्धा ०.५२५% सोडियम हायपोक्लोराइटमध्ये बुडवुन पाण्याने धुतल्यासही निर्जंतुक होतात. व्हर्टिसिलियम लेकॅनिलवर आधारीत जैव बुरशीनाशकेही अॅफिडच्या संख्येला आळा घालण्यासाठी वापरली जाऊ शकतात. कीटनाशक साबणही संसर्गाच्या सुरवातीला परिणामकारकरीत्या वापरला जाऊ शकतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या जंतुसंसर्गासाठी कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. अॅफिडसचे नियंत्रण मात्र विविध रसायनिक उत्पाद जसे कि सायपरमेथ्रिन, क्लोरपायरीफॉस, इमिडाक्लोप्रिड, पिरिमिकार्ब किंवा कार्बोसल्फान वापरुन केले जाऊ शकते.
हा रोग पपयीला तसेच इतर पिकांनाही बाधीत करतो जसे कि कुकुरबिटचे कुटुंब. ह्याचा प्रसार एका रोपापासुन दुसर्या रोपावर मुख्यत्वेकरुन अॅफिडद्वारे किंवा शेतकाम करताना झालेल्या जखमांद्वारे होतो. रोगाचा प्रसार होण्याचे इतर मार्ग आहेत बाधीत सामग्री वापरुन केलेल्या कलमाद्वारे किंवा शेतीतील कामे करताना रोपाला झालेल्या जखमांद्वारे होतो. ह्याचा संबंध बहुधा इतर रोगजंतुद्वारे झालेल्या रोगांशी जोडला जातो आणि त्या बाबतीत लक्षणे थोडी वेगळी असतात. पपयांमध्ये ह्या रोगाचे महत्व कमी असते पण जर हवामान त्याला अनुकूल असेल तर पिकाचे नुकसान होऊ शकते.