PaLCV
विषाणू
ह्या रोगाचे अतिशय स्पष्ट दिसणारे लक्षण म्हणजे पाने खालुन आतल्या बाजुला मुडपणे. इतर लक्षणांत येते पानांच्या शिरा जाड होणे, काही वेळा त्यावर गाठी येणे. पाने खडबडीत होऊन उलट्या कपासारखी दिसणे आणि देठ विकृत आकाराचे होउन पिळ दिल्यासारखे दिसणे. बहुधा वरची पानेच जास्त बाधीत होतात. रोगाच्या नंतरच्या टप्प्यावर पानगळती होऊ शकते. रोपाची वाढ खुंटते आणि फुले किंवा फळे फारच कमी येतात. जर फळे आलीच तर छोटी आणि आकाराने विकृत असतात आणि अकालीच गळु शकतात.
व्हाईट ऑईल इमल्शन (१%)चा फवारा मारल्याने अॅफिडसद्वारे ह्या रोगजंतुंचे वहन कमी होते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रोगजंतुच्या संसर्गासाठी कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. तरीपण व्हाईटफ्लाइजची संख्या नियंत्रणात ठेवल्यास ह्या संसर्गाची गंभीरता कमी करता येऊ शकते. पेरणीच्या वेळी कार्बोफ्युरानचा जमिनीत वापर केल्यास आणि डायमिथोएटचे किंवा मेटासिस्टॉक्सचे ४-५ पानांवरील फवारे १० दिवसांच्या अंतराने मारल्यास व्हाईट फ्लायची संख्या नियंत्रणात येते.
ह्या रोगाचा प्रसार मुख्यत: व्हाईटफ्लाय बेमिशिया टबासी नावाच्या रोगजंतुद्वारे होतो. हा जंतु अविरतपणे ह्या रोगाचा प्रसार एका रोपावरुन दुसर्या रोपावर करत असतो. ह्याचाच अर्थ असा कि जेव्हा हा रोगजंतु वाहकात सक्रिय असतो तेव्हा ह्याचे संक्रमण काही सेकंदात होते. ह्या रोगाचा प्रसार होण्याची इतर कारणे आहेत, बाधीत बियाणे किंवा अंकुर तसेच, कलम करण्याची साधने. पपयांबरील बोकड्येचा प्रसार शेतातील अवजारांच्या वापराने होत नाही. ह्याचे पर्यायी यजमान आहेत टोमॅटो आणि तंबाखुची रोपे. रोगजंतुंचा प्रसार खूप दूरवर झाला आहे पण आजकाल ह्याच्या घटना फार कमी प्रमाणात दिसतात. तरीपण काही ठराविक भागात ह्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.