पपई

वर्तुळाकार डाग निर्मान करणारा विषाणू

PRSV

विषाणू

थोडक्यात

  • फळावर गडद वर्तुळाकार डाग दिसतात.
  • पानावर पिवळी ठिगळासारखी संरचना दिसते.
  • खोड आणि फांद्यांवर पाणी शोषल्यासारखे ठिपके व रेषा दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

6 पिके

पपई

लक्षणे

संसर्गाच्या वेळी रोपाचे वय, जोम आणि विषाणूची ताकद याप्रमाणे लक्षणे थोडी बदलु शकतात. पानावर गडद हिरवी फोडासारखी रचना पहिल्यांदा दिसते. नंतर, हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटामध्ये ही फोडासारखी संरचना विकसित होते. रोगाच्या नंतरच्या टप्प्यांवर, पाने बुटाच्या दोरासारखी दिसतात आणि त्यावर ठिगळा सारखी संरचना व पिवळे आणि तपकिरी करपट ठिपके दिसतात. पानांचा आकार चांगलाच कमी होतो, त्यामुळे रोपाची वाढ खुंटते आणि झाडोरा कमी होतो. खोड आणि देठाच्या बुडाशी पाणी शोषल्यासारखे पिवळसर ठिपके आणि तेलकट रेषा सुद्धा दिसतात. संक्रमित फळांवर अनेक गडद हिरवे, बहुधा खोलगट, तेलकट वर्तुळाकार डाग दिसातात आणि फळे नेहमीपेक्षा कमी आकाराची आणि विकृत आकाराची होतात. संक्रमण जर सुरुवातीच्या काळात झाले असेल तर फळे विक्री करण्यायोग्य रहात नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

माव्याद्वारे विषाणूंना उचलणे आणि प्रसार रोखण्यासाठी १% च्या एकाग्रतामध्ये पांढऱ्या तेलांच्या मिश्रणाची फवारणी करावी. यीस्टस, अॅक्टिनोमायसेटस आणि फोटोसिंथेटिक यासारखे काही प्रकारचे मित्र जीवाणूंच्या मिश्रणामुळे रोग प्रादुर्भाव कमी केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. ह्या विषाणूच्या संक्रमणाविरुद्ध कोणताही थेट रसायनिक उपाय नाही. तरीपण डायमेथोएट किंवा अझाडीराच्टीनच्या पानांवरील फवारणीने माव्याची संख्या कमी होते. पहिले लक्षण दिसताच दर पंधरा दिवासांनी फवारणी करावी.

कशामुळे झाले

विषाणूचा प्रसार माव्याच्या विविध जातींनी अविरत केला जातो. माव्यामध्ये यांची संख्या वाढत नाही, म्हणुन रोपा-रोपातील प्रसार हा कमी काळात (एका मिनीटापेक्षा कमी) व्हावा लागतो. विषाणूला कलिंगड व इतर वेलवर्गीय पिके असे बरेच पर्यायी यजमान असतात परंतु त्याचे प्रधान लक्ष्य म्हणजे पपई होय. पंखवाल्या माव्याची संख्या खूप जास्त झाल्यास या रोगाचे संक्रमण जास्त वेगाने पसरते. थंड वातावरणात पानावरील लक्षणे (ठिगळ संरचना आणि विकृतपणा)बळावतात.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासुन धरलेले किंवा प्रमाणित स्त्रोताकडील बियाणे घ्या.
  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • जो भाग संसर्गमुक्त आहे तिथे लागवड करा.
  • बागेच्या कडेने मका किंवा हिबिस्कस सब्दारिफा सारखी यजमान नसणारी पीके लावा.
  • बागेच्या भागात वेलवर्गीय पिकांची लागवड टाळा.
  • माव्याची उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी लागवडीची वेळ समायोजित करा.
  • विषाणूंनी संक्रमित झाड किंवा त्यांचे भाग काढुन टाका.
  • शेतातुन आणि आजुबाजुने तण नियंत्रण चोखपणे राखा.
  • किड्यांमुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जाळी वापरा.
  • लक्षणे अजुन बळावु नयेत म्हणुन उत्तम खत नियोजन पाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा